Headlines

Sugar Price Hike Reasons Explained; साखर दिवसेंदिवस महाग, लवकरच 80 रुपये प्रति किलो होण्याची शक्यता; साखरेचे दर वाढण्याची तीन कारणे!

Why Sugar Rate Hike Explained: भारतातील खुल्या बाजारातील साखरेच्या किंमती आतापर्यंतच्या उच्चांकीवर पोहोचल्या आहेत आणि सणासुदीच्या काळात या दरवाढीच्या आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये एकच प्रश्न सध्या चर्चेत आहे तो म्हणजे की अचानक साखरेच्या किंमती वाढण्याचे कारण काय?

Sugar Price Hike Reason Explained
साखरेचे दर वाढण्याची तीन कारणे!
Sugar Rate in India: सणासुदीच्या तोंडावर देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये साखरेच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. खुल्या बाजारातील अलीकडच्या दरवाढीने सरकारच्याही चिंतेत भर पाडली आहे, ज्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांसाठी साखरेच्या साठ्याची मर्यादा कडक केली गेली आहे. तसेच आता सणासुदीपूर्वी किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताला 10 वर्षांत प्रथमच साखर आयात करणे भाग पडू शकते. अशा स्थितीत, प्रश्न उपस्थित होतो की, ही परिस्थितीच का निर्माण झाली?

एका महिन्यात साखरेचा गोडवा 13% महागला

एका महिन्यात साखरेचा गोडवा 13% महागला

सणासुदीचे दिवस सुरू होण्याआधी देशभरातील अनेक राज्यांमध्ये साखरेचे भाव चढेच राहिले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून साखरेच्या किंमतीत सतत वाढ होताना या काळात देशात साखरेच्या सरासरी किरकोळ दरात गेल्या महिन्यात 13.04 टक्के वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून समोर येते.

साखरेच्या स्टॉकवर सरकारची नवीन मर्यादा

साखरेच्या स्टॉकवर सरकारची नवीन मर्यादा

सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारने साखरेच्या साठवणुकीवरील मर्यादा आणखी कडक केल्या आहेत. सरकारच्या नवीन आदेशांनुसार जे व्यापारी दरमहिन्याला 10 मेट्रिक टनपेक्षा जास्त साखरेचा व्यापार किंवा वापर करतात, त्यांना आता जास्तीत जास्त 15 दिवस पुरेल इतकीच साखर बाळगण्याची परवानगी असेल. 1 सप्टेंबरपासून हा नवीन नियम लागू होईल आणि 30 नोव्हेंबरपर्यंत अंमलात राहील.

10 वर्षांत पहिल्यांदाच साखर आयातीची नामुष्की

10 वर्षांत पहिल्यांदाच साखर आयातीची नामुष्की

शेतात पुरेसा ऊस आहे, पण सरकारच्या महत्त्वाकांक्षी इथेनॉल कार्यक्रमासाठी शेकडो डिस्टिलरीज उभारल्या गेल्या आणि देशांतर्गत पुरवठा सुरक्षित राखण्यासाठी सरकारने निर्यातीवर आधीच निर्बंध घातले. तरीही साखरेचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत, ज्यामुळे मोदी सरकारला गेल्या अनेक दशकांपासून शक्यतो टाळला जाणारा पर्याय – साखर आयात – पर्यायाचा विचार करावा लागत आहे.

साखरेच्या विक्रमी दरवाढीची कारणे काय

साखरेच्या विक्रमी दरवाढीची कारणे काय

सणासुदीच्या तोंडावर स्वयंपाकातील प्रमुख घटक असलेल्या साखरेच्या दरात अचानक झालेल्या या प्रचंड दर वाढीमुळे अनेकांच्या चहाचा गोडवाच नाहीसा झाला. तर, सध्या साखरेचे भाव 65 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. साखर निर्यातीचा भत्ता आणि ऊसावर आधारित फीडस्टॉक इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्याबरोबरच कमी उत्पादन ही कारणे अलीकडच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरणारे प्रमुख घटकांपैकी आहेत.

साखरेच्या महागाईमागे इथेनॉलचे कारण

साखरेच्या महागाईमागे इथेनॉलचे कारण

बऱ्याच अंशी हे कारण बरोबर मानलं जात आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचे सरकारचे E20 लक्ष्य पूर्ण करण्यासाठी उसाचा रस आणि मळीचा मोठा भाग इथेनॉल उत्पादनाकडे वळवला गेला. यामुळे, साखर कारखान्यांमध्ये उसाची कमतरता निर्माण झाली, उत्पादन घटले आणि बाजारातील पुरवठा-मागणीच्या संतुलनात व्यत्यय येऊन किमती वाढल्या आहेत.

सणासुदीत साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता

सणासुदीत साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता

भारत साखरेचा जगातील सर्वात सर्वात ग्राहक देश आहे. आपल्याकडे ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यांदरम्यान गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणासुदीच्या दिवसांत साखरेची मागणी वाढते. घरा-घरांत गोडाधोडाचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते त्यामुळे, मिठाई, बिस्किटे आणि कन्फेक्शनरी बनवणाऱ्या कंपन्याही मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करतात. त्यामुळे, पुढील काही दिवसांत साखरेचा गोडवा आणखी महाग होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.

साखरेची जमाखोरी

साखरेची जमाखोरी

साखरेच्या जमखोरीमुळे खुल्या बाजारातील साखरेचे दर 65 रुपये किलोच्या वार्षिक उच्चांकावर पोहोचले आहेत. त्यामुळे साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सणासुदीच्या काळातील (गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी) अगदी आधी पुरवठा नियंत्रित करण्यासाठी नवीन नियम लागू केले जात आहेत. मोठ-मोठ्या व्यापाऱ्यांनी साखरेचा पुरवठा रोखून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली, ज्याचा थेट परिणाम किंमतीवर झाला.

कमी पाऊस अन् कोरड्या हवामानाने वाढवली चिंता

कमी पाऊस अन् कोरड्या हवामानाने वाढवली चिंता

त्याचवेळी, साखरेदीच्या पुरवठ्याबाबत चिंता केवळ वाढत्या मागणीमुळेच नाही. देशातील काही भागांतील उसाच्या पिकावर अनियमित पाऊस आणि कोरड्या हवामानाचा परिणाम झाला, परिणामी उसाचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न झाल्यास पुढील काही दिवसांत साखरेचे उत्पादन आणि उपलब्धता प्रभावित होऊ शकते. अशा परिस्थितीत, सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी किमतींवर आणखी दबाव वाढू शकतो.

महागाईचा राक्षस सरकारच्या मानगुटीवर

महागाईचा राक्षस सरकारच्या मानगुटीवर

साखर भारतीयांच्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात संवेदनशील पदार्थ असून त्याच्या दरवाढीचा सर्वसामान्य कुटुंबांच्या बजेटवर थेट परिणाम होतो. सणासुदीच्या दिवसांत साखरेची मागणी वाढते, त्यामुळे सरकारने दर नियंत्रणात आणण्यासाठी सातत उपाययोजना करत आहे. यादरम्यान, सरकारने साखरेचा साठा मर्यादा 30 दिवसांवरून 15 दिवसांपर्यंत कमी केली असून आता सरकार साखरेची उपलब्धता, दर आणि नवीन हंगामातील पिकावर बारकाईने लक्ष ठेवून असेल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा