Headlines

Vidhan parishad election bjps plan revealed in satara special strategy due to lack of trust in shivsena ncp; साताऱ्यात भाजपला नव्हता मित्रपक्षांवर भरवसा, म्हणून आखला होता खास प्लॅन


सुधीर पाटील, सातारा : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील भाजपच्या मतदान प्लॅनची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. निवडणुकीतील विजयाचे गणित मतांच्या पसंती क्रमांकावर होते. त्यातच भाजपला आपल्या मित्र पक्षांवर भरवसा नव्हता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांकडून दगाफटका होण्याचा संभाव्य धोका ओळखून भाजप नेत्यांनी खास प्लॅन आखला होता. त्याची मित्र पक्षांना कानोकान खबर लागू दिली नव्हती. त्यामुळेच विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला आणि प्लॅन यशस्वी ठरला.

सांगली-सातारा विधान परिषद मतदार संघात एकूण ८९५ पैकी ८९४ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ८८५ मते वैध तर ९ मते अवैध ठरली. विजयासाठीचा कोटा ४४३ मतांचा होता. महायुतीतील भाजपचे उमेदवार धैर्यशिल ज्ञानदेव कदम यांना पहिल्या पसंतीची ५९३ मते मिळाली. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप ३२५, राष्ट्रवादी (अ. प.) २०५, शिवसेना (शिंदे गट) ११६, राष्ट्रवादी (श. प.) १२०, काँग्रेस ७४, शिवसेना उबाठा १, स्थानिक आघाड्या आणि अपक्ष ५४, असं पक्षनिहाय संख्याबळ होतं. महायुतीकडे एकूण ६४६ तर महाविकास आघाडीकडे १९५ मते होती. स्थानिक आघाड्या आणि अपक्ष ५४ मतदारांपैकी बहुतांश मतदार महायुतीच्या गोटातील होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील मित्रपक्षांच्या मतदारांची बेरीज ३२१ होती.

हा आकड्यांचा खेळ लक्षात घेता मित्र पक्षांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मत दिले आणि घोडेबाजार होऊन भाजपच्या काही मतदारांनी पसंती क्रम बदलला तर भाजप उमेदवाराचा पराभव निश्चित होता. हा संभाव्य धोका ओळखून फक्त धैर्यशील कदम यांनाच पहिल्या पसंतीचे मत द्यायचे. दुसऱ्या पसंतीचे मत द्यायचेच नाही, अशी सक्त सूचना भाजपने आपल्या ३२५ मतदारांना केली होती. भाजपचा निवडणूक गेम प्लॅन यशस्वी ठरला. तरीही महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची जवळपास १०० मते फोडून भाजपला मोठा झटका दिला.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत