Headlines

Naiyya Saggi BabyChakra Founder Success Story; ‘नोकरी सोडून काय करशील?’ पोरीनं अब्जावधींच्या तीन-तीन कंपन्या सुरू केल्या

Naiyya Saggi Success story: ‘बेबीचक्र’च्या संस्थापक आणि ‘द गुड ग्लॅम ग्रुप’च्या सह-संस्थापक नाय्या सग्गीहार्वर्डमधून भारतात मायदेशी परतल्या. पण, उद्योजक भारतात परतल्यानंतर आजोबांनी तीन महिने बोलणे बंद केले होते. अमेरिकेतील एक उत्तम संधी सोडून परत येणे त्यांना अन्यायकारक वाटले.

Naiyya Saggi Success Story
नैय्या सग्गी कोण?
Success Story: हार्वर्ड पदवीधर नैय्या सग्गी यांनी अमेरिकेतील करिअर नाकारून भारतात परतण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल खुलासा केला. तुमच्या कुटुंबातील एखादे मूल जगातील सर्वोत्तम विद्यापीठ हार्वर्डमध्ये शिकायला गेले, त्याला पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली, नोकरीच्या उत्तम संधी तयार असतील आणि अमेरिकेत स्थायिक होण्याची सुवर्णसंधी मिळाली. पण तेच मूल अचानक सगळं सोडून भारतात परतले, तर कुटुंबाची रिॲक्शन काय असेल?

हार्वर्ड पदवीधर अमेरिका सोडून भारतात परतली

हार्वर्ड पदवीधर अमेरिका सोडून भारतात परतली

प्रसिद्ध उद्योजिका नैय्या सग्गी यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं. अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून जेव्हा नय्या भारतात परतल्या तेव्हा घरी कोणताही आनंदोत्सव साजरा झाला नाही. उलट त्यांचे आजोबा इतके नाराज झाले होते की, त्यांनी तीन महिने आपल्या नातीशी संवादच साधला नाही. प्रत्येक भारतीय ज्या उज्वल भविष्याचे स्वप्न बघतो, आपल्या नातीने तेच उद्ध्वस्त केलं असं त्यांना वाटले. प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर विराज अला यांच्यासोबत एका विशेष मुलाखतीत नय्याने आपल्या आयुष्यातील रंजक किस्सा सांगितला.

पालक सरकारी नोकरीत, मुलीला हार्वर्ड शिष्यवृत्ती

पालक सरकारी नोकरीत, मुलीला हार्वर्ड शिष्यवृत्ती

नय्या सामान्य विद्यार्थिनी नव्हत्या. त्यांना हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून MBA साठी पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली होती पण त्यापूर्वी, नय्याने नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडियामध्ये कायद्याचे (BA L.L.B) शिक्षण घेतले. हार्वर्डमधील शिक्षणादरम्यान नय्या फुलब्राइट आणि जे.एन. टाटा शिष्यवृत्तीधारकांपैकी होत्या. MBA पूर्ण केल्यानंतर नैयाला अमेरिकेतील द ब्रिजस्पॅन ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
नय्या कदाचित श्रीमंत कुटुंबातून असतील आणि स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भरपूर पैसा असेल, असे बऱ्याच लोकांना वाटायचे. पण नय्या यांनी स्वतः हाच गैरसमज दूर केला आणि “मी श्रीमंत कुटुंबातील नाही, माझे आई-वडील दोघेही सरकारी नोकरीत होते,” असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

भारतात परत येण्याचे खरे कारण

भारतात परत येण्याचे खरे कारण

हार्वर्ड शिक्षण पूर्ण केल्यावर अमेरिकेत एक वर्ष नोकरी केल्यावर 2015 मध्ये नय्याने बॅग भरली आणि भारताचे तिकीट बुक केले. मायदेशी परतण्याचे त्यांचे ध्येय स्पष्ट होते – “मला जग बदलायचे आहे.”

भारतात येताच सुरू केला पहिला स्टार्टअप

भारतात येताच सुरू केला पहिला स्टार्टअप

भारतात परतल्याने नैय्याचे पालक आणि आजोबा नाखूष होते, पण तरीही त्यांना स्वतःचा निर्णय योग्य सिद्ध करून दाखवायचं होतं. मायदेशी परतताच त्यांनी पहिल्या कंपनीचा पाया घातला. नय्याने बहिणीला गरोदरपणात अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी संघर्ष करताना पाहिले व यातूनच प्रेरणा घेत त्यांनी ‘बेबीचक्र’चा जन्म झाला. 2021 मध्ये या कंपनीचे ‘मायग्लॅम’मध्ये मर्जर झाले. त्यानंतर, नय्याने प्रियांका गिल आणि दर्पण संघवी यांच्यासोबत ‘द गुड ग्लॅम ग्रुप’ची सह-स्थापना केली, तर आज तिची तिसरी ग्राहक-तंत्रज्ञान कंपनी, EDT सुरू करत आहे.

शिगेला पोहोचलेला आजोबांचा राग

शिगेला पोहोचलेला आजोबांचा राग

जगातील प्रतिष्टीत विद्यापीठातून शिक्षण घेऊन, मग अमेरिकेतील नोकरी सोडून मायदेशी परतणं नैय्याच्या कुटुंबियांना पटलं नाही, आजोबांना जणू मोठा धक्काच बसला होता. त्यावेळची परिस्थिती आठवत नय्या म्हणाल्या, “मी 2015 मध्ये परतले, तेव्हा आजोबा माझ्याशी तीन महिने बोलले नाहीत. फक्त एवढंच म्हणाले, ‘तुला आयुष्यातली सर्वात मोठी संधी मिळाली होती, तू अमेरिकेत स्थायिक होऊ शकली असतीस, तुला नोकरीच्या उत्तम संधी होत्या, पूर्ण शिष्यवृत्ती होती, मग तू सगळं सोडून इथे काम करायला आणि कंपनी उभी करायला का आलीस?’”

फक्त एका ‘हो’ची गरज

फक्त एका ‘हो’ची गरज

आज नय्या सग्गीच्या तीन कंपन्यांचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे 8300 कोटी रुपये पार पोहोचले आहेत. आजोबांची नाराजीही आता अभिमानात बदलली असेल. नैय्या म्हणतात की, यशाच्या या लांब प्रवासात तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या त्या ‘हो’चीच तुम्हाला गरज असते.

उद्योजकांसाठी मोठा संदेश

उद्योजकांसाठी मोठा संदेश

कोणताही मोठा वारसा नाही किंवा मोठी आर्थिक नाही पण, स्वबळावर यश मिळवणाऱ्या अशा असंख्य तरुणांसाठी नय्याचा प्रवास एक जिवंत उदाहरण आहे. ‘आपल्या देशातील फाउंडर्स आणि आपल्या टीममध्ये इथेच भारतात अशा कंपन्या उभारण्याची ताकद आहे, ज्या जगात दबदबा निर्माण करू शकतात, असे नैय्या यांचे म्हणणे आहे.’

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा