Headlines

Zee Marathi Actress : जिकडे राहायची त्यांनी पनवती म्हणून हिणवलं, स्वाभिमानानं घर सोडलं, तीन दिवस दादर स्टेशनवर राहिली; मराठी अभिनेत्रीनं सांगितला संघर्षकाळ


Krutika Tulaskar On Struggle : ‘रात्रीस खेळ चाले’ फेम कृतिका तुळसकरनं एका मुलाखतीमध्ये तिचा संघर्षकाळ सांगितला आहे.

Krutika Tulaskar On Struggle
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक कलाकार संघर्ष करत असतो. मराठी कलाकारांनी संघर्ष करत आजवर इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. नाटकांमध्ये लहान भूमिका साकारत इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान मिळवणारे अनेक कलाकार आहेत. त्यापैकी एक म्हणजेच मराठी अभिनेत्री कृतिका तुळसकर . कृतिकानं बालपणी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ती मुंबईत आली. मुंबईमध्ये अभिनेत्रीला संघर्ष करावा लागला. एकदा तर कृतिका तीन दिवस दादर स्टेशनला राहिली होती. याबद्दल कृतिकानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

कृतिकानं सांगितला संघर्षकाळ

कृतिका तुळसकर म्हणाली, ‘मी ज्या कुटुंबासोबत राहत होते, त्या मुलीची आई म्हणाली की, ‘तू निघून जा, तू पनवती आहेस, तुझ्यामुळे माझ्या मुलीला काम मिळत नाहीये.’ त्यावेळी मी स्वतःला फीट ठेवण्यासाठी व्यायाम करायचे. त्यानंतर नाटकांच्या संस्थांमध्ये जायचे, त्यांच्या संपर्कात राहायचे. ती मुलगी पण माझ्यासोबत नाटकात होती. पण, तिला जास्त काम मिळत नव्हतं, म्हणून तिची आई असं म्हणालेली. मी स्वाभिमानी आहे. मी तिथून निघाले, दादरला आले आणि विचार केला, आता मी घरी जाते. पण नंतर विचार आला, जर मी घरी गेले तर मी परत मुंबईत येऊ शकत नाही’

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

‘सलग तीन दिवस मी दादर स्टेशनला राहिले. मी आधी ज्या काकांकडे राहिले, त्यांना मी तेव्हा मेसेज केलेला. तिसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला. मी लहानपणापासून नाटकांमध्ये काम केलेलं आहे. त्यातून जे पैसे मिळाले, त्याचे दागिने बनवले होते. ते दागिने घेऊन मी मुंबईत आले होते. ते दागिने माझ्याकडे होते. त्यामुळे तिथून कुठे जाऊ शकत नव्हते. वॉशरूमला पण जाताना मी सगळं सामान घेऊन जायचे. मग काका मला घ्यायला आले, त्यांनी मला त्यांच्याकडे राहायला जागा दिली. त्यानंतर मला जोगेश्वरीला पीजीमध्ये जागा मिळाली, मी तिथे राहायला गेले.’ असं कृतिकानं सांगितलं. ‘कलाकार’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कृतिका बोलत होती.

Maharashtra TimesTukaram Mundhe : ‘व्यक्ती कुणीही असो, कारवाई केली जाईल’, अजय, शाहरुख, टायगरच्या ‘विमल इलायची’ जाहिरातीबाबत तुकाराम मुंढेंची ठाम भूमिका
दरम्यान, कृतिका तुळसकरला झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमध्ये तिनं शेवंताची भूमिका साकारलेली. अभिनेत्रीच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा