Headlines

विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मार्यादा ओलांडली, सिब्बलांचे ताशेरे



‘शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह’ या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे नाव व चिन्ह त्यांना बहाल केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आणि पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी नकार दिल्याच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला उद्ध‌व ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरेंची बाजू मांडत आहेत. आजच्या ६ व्या दिवशीच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमक आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा युक्तिवाद मांडला. सिब्बल यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या घटनात्मक अधिकारांवर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडलेले प्रमुख मुद्दे, १० व्या अनुसूचीचा दिलेला संदर्भ, आणि या युक्तिवादाचा या खटल्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचे सविस्तर विश्लेषण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत!



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत