Headlines

विनोद तावडेंवर भाजपकडून मोठी जबाबदारी, पुढचं टार्गेट ठरलं! – bjp has appointed vinod tawde as in-charge of the uttar pradesh assembly.


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्याचं ऐनवेळी तिकीट कापण्यात आलं, ज्यांना पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे साइडलाइन केलं, या नेत्याचं राजकारण आता संपलं.. असं अनेकांना वाटलं होतं. पण अवघ्या काही वर्षांत परिस्थिती पूर्ण बदलली! आज दिल्लीच्या भाजप वर्तुळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत अत्यंत महत्त्वाचा चेहरा म्हणून ज्या नेताचं नाव घेतलं जातं, ते नाव म्हणजे विनोद तावडे. महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस… आणि आता राष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या मोठ्या जबाबदाऱ्या! विनोद तावडे यांनी दिल्ली दरबारी आपलं राजकीय वजन कसं वाढवलं? निष्ठा आणि शांत संयमाच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात स्वतःचा जम कसा बसवला? आणि विनोद तावडेंचं भाजपमध्ये वाढणारं वजन हे फडणवीसांना खरंच धोकादायक ठरू शकतं का? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत