आयटी प्रमुखपदी दीपक म्हस्के, पक्षसंघटनेत केले व्यापक परिवर्तन, तरुण-महिलांना अधिक संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय पक्षसंघटनेच्या रचनेत व्यापक परिवर्तन केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 7 महिन्यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या प्रमुखपदी छत्तीसगडमधीचे दीपक म्हस्के यांची नियुक्ती, हे सर्वात महत्वाचे परिवर्तन मानले जात आहे. पदाधिकाऱ्यांची निवड करताना युवक आणि महिला यांना प्राधान्य देण्यात आल्याचेही स्पष्टपणे दिसून येत आहे.
गेली 11 वर्षे भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्ष प्रमुख पदाची धुरा सांभाळणारे अमित मालवीय यांचे स्थान आता दीपक म्हस्के यांना देण्यात आले आहे. अलिकडच्या सोशल मिडियाच्या युगात पक्षाच्या प्रचार आणि प्रसाराच्या संदर्भात सर्वात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या या कक्षात नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांची नावे, प्रीती गांधी, शिवानंद द्वेवेदी, अलोक भट आणि अरुण यादव अशी आहेत. अमित मालवीय यांनी त्यांचे अभिनंदन केले. पक्षाच्या संपर्कप्रमुखपदी अनिल बलुनी यांनाच ठेवण्यात आले असून त्यांना साहाय्य करण्यासाठी अशीष उषा अग्रवाल, प्रदीप भंडारी आणि सिद्धार्थ यादव यांची नियुक्ती सहसंपर्कप्रमुख म्हणून करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
राम माधव उपाध्यक्षपदी
पक्षासाठी 13 उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भारतीय जनता पक्षात आलेले राम माधव यांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत आणि आंध्र प्रदेशातील लोकसभा खासदार डी. पुरंदेश्वरी यांनाही उपाध्यक्ष करण्यात आले आहे.
कोषाध्यक्षपदी पियुष गोयल
पक्षाच्या कोषाध्यक्षपदी (खजिनदार) केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची नियुक्त वैशिष्ट्यापूर्ण मानली जात आहे. तर संघटन महासचिव पद बी. एल. संतोष यांच्याकडे राखण्यात आले. पक्षाच्या महासचिवपदी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब यांचा समावेश 8 राष्ट्रीय महासचिवांच्या सूचीत करण्यात आला आहे. सुनिल बन्सल आणि महाराष्ट्राचे विनोद तावडे यांनाही राष्ट्रीय महासचिव म्हणून महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रीय सचिवपदी चार नवे आणि तरुण चेहरे देण्यात आले असून, त्यांची नावे कविता पाटीदार, के, सुरेंद्रन, संदीप पाठक आणि मनोज टिग्गा अशी आहेत.
बारा महिलांचा समावेश
पक्षाच्या विविध पदारांवर एकंदर 12 महिलांना स्थान देण्यात आले आहे. त्यांच्यावर महत्वाचे संघटनात्मक उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील नव्या आणि तरुण नेत्यांना पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आल्याचेही दिसून येते. पदाधिकाऱ्यांची निवड करताना सामाजिक समीकरणे, महिला आणि युवक यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
विधानसभा निवडणुकांचे आव्हान
येत्या सात ते आठ महिन्यांमध्ये उत्तर प्रदेश या भारतातील सर्वात मोठ्या राज्यासह अन्य चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब ही अन्य चार राज्ये आहेत. सध्या या राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची पूर्ण बहुमताची सरकारे आहेत. ही चार राज्ये स्वत:कडे राखणे आणि पंजाबमध्ये स्थिती सुधारणे ही आव्हाने पक्षासमोर आहेत. पक्षपदाधिकाऱ्यांची निवड करताना या आव्हानांचा विचार केला गेला आहे, असे स्पष्ट दिसून येते.
दृष्टिक्षेपात नवी संघटनरचना
तेरा राष्ट्रीय उपाध्यक्ष
- वसुंधराराचे सिंदिया (राजस्थान). 2. तीर्थसिंग रावत (उत्तराखंड), 3. राम माधव (दिल्ली), 4. बिजयंत जय पांडा (ओडीशा), 5.. डॉ. डी. पुरंदेश्वरी (आंध्र प्रदेश), 6. रेखा वर्मा (उत्तर प्रदेश), 7. वर्षाबेन नरेंद्रभाई दोषी (गुजरात), 8. डॉ. भारती प्रवीण पवार (महाराष्ट्र), 9. सरदार मनप्रीतसिंग बादल (पंजाब), 10. लाल सिंग आर्य (मध्यप्रदेश), 11. प्रा. नागराज (कर्नाटक), 12. प्रा. तारीक मन्सूर (उत्तर प्रदेश), 13. डॉ. मधुचंद्र कर (पश्चिम बंगाल)
आठ राष्ट्रीय महासचिव
- विनोद तावडे (महाराष्ट्र), 2. सुनिल बन्सल (दिल्ली), 3. बिप्लव कुमार देब (त्रिपुरा), 4. स्मृती इराणी (उत्तर प्रदेश), 5. डॉ. सतीश पुनिया (राजस्थान), 6. गजेंद्र पटेल (मध्यप्रदेश), 7. हरीष द्विवेदी (उत्तर प्रदेश), 8. संजय भाटिया (हरियाणा)
सोळा राष्ट्रीय सचिव
कविता पाटीदार (मध्यप्रदेश), के. सुरेंद्रन (केरळम), भोला सिंग (उत्तर प्रदेश), डॉ. प्रदीप वर्मा (उत्तराखंड), जगदीश ईश्वरभाई पटेल (गुजरात), संदीप पाठक (दिल्ली), फांगनोन कोन्याक (नागालँड), संगीता यादव (उत्तर प्रदेश), अनिल अँटोनी (केरळम), एम. व्यंकटेशन (तामिळनाडू), मनोज टिग्गा (पश्चिम बंगाल), सिद्धार्थ शंभू (बिहार), डॉ. स्वदेश सिंग (दिल्ली), मृगांका देब बर्मन (आसाम), मोहन गुप्ता (गुजरात), जयप्रकाश (दिल्ली)
कोषाध्यध आणि कार्यालय अधिकारी
पियुष गोयल (महाराष्ट्र), सह कोषाध्यक्ष राजेश मंगल (राजस्थान), मुख्यालय प्रमुख तरुण चुघ (पंजाब), मुख्यालय सचिव महेंद्र पांडे (उत्तराखंड)
राष्ट्रीय समन्वयक
ईशान्य भारत समन्वयक डॉ. संबित पात्रा, ईशान्य भारत सहसमन्वयक राजीव बब्बर (दिल्ली), सर्व कक्ष समन्वयक विष्णुदत्त शर्मा (मध्यप्रदेश), सर्व कक्ष सहसमन्वयक रितुराज सिन्हा (बिहार), विष्णुवर्धन रे•ाr (आंध्र प्रदेश).
