Headlines

Bhandara News: रेती उत्खननाचा 71 कोटींचा दंड रद्द? शिवसेनेच्या दाव्याने भंडाऱ्यात खळबळ; प्रशासनाकडून इन्कार – bhandara rs 71 crore sand mining fine cancelled shiv sena claim sparks a stir


म. टा. वृत्तसेवा, भंडारा: मंजूर क्षमतेपेक्षा अधिक रेती उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर पवनीच्या तहसीलदारांनी ७१ कोटी २७ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, भंडाऱ्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दंडाचा आदेश रद्द केला. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. प्रशासनाने मात्र दंड रद्द केला नसून तहसीलदारांना फेरतपासणीचे निर्देश दिल्याचा दावा केला आहे.

पवनी तालुक्यातील गुडेगाव रेतीघाट मनोजकुमार अगरवाला, तुषार अनोज अजितसरिया रा. नागपूर यांना मिळाला होता. या रेतीघाटातून १४ हजार १३० ब्रास रेती उत्खननास मंजुरी देण्यात आली होती. प्रत्यक्षात या घाटातून ३४ हजार ६०० ब्रास रेतीचे उत्खनन झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. डिसेंबर २०२५मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकरणी लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दंड आकारणी व गुन्हा नोंद करण्याबाबत भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी आणि पवनीच्या तहसीलदारांनी लक्ष दिले नाही, असा ठपका ठेवला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आणि तहसीलदारांविरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते.

Maharashtra TimesSanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, महाराष्ट्रात एक, दोन केंद्रात; संजय राऊतांचा भाजपवर घणाघातदरम्यान, आमदार भोंडेकर यांच्या लक्षवेधीनंतर ९ जानेवारी रोजी पवनीच्या तहसीलदारांनी गुडेगाव रेतीघाटाच्या कंत्राटदारावर ७१ कोटी २७ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, कंत्राटदाराने हा दंड भरला नाही. त्यानंतर १३ ऑगस्ट २०२६ रोजी भंडाऱ्याच्या उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांनी दंडाचे आदेश रद्द केले, असा आरोप शिवसेनेचे संजय कुंभलकर, अनिल गायधने, विकास मदनकर, नितीन धकाते यांनी दिला आहे. दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

‘ईटीएस मोजणी केलीच नाही’

गुडेगावच्या तलाठ्यांनी २ मे २०२५ रोजी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर १० मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामा करून ३४ हजार ६०० ब्रास अवैध रेती उत्खनन झाल्याचे नमूद केले. १३ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन रेती उत्खननाचे ‘ईटीएस’ म्हणजेच अचूक मोजमाप करण्याबाबत कळविले होते. मात्र, जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी ईटीएस मोजणी केली नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

Maharashtra TimesGirish Mahajan: महाजनच नाशिकचे ‘पालक’, कुंभमेळ्याचा पार्श्वभूमीवर भाजपची सरशी; छगन भुजबळ, दादा भुसे यांना डावललेरेती उत्तखनप्रकरणी दंडाचे आदेश रद्द करण्यात आले नाहीत. पवनीच्या तहसीलदारांना फेरतपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुडेगाव रेती घाटाचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून नव्याने आदेश पारित केले जातील.– माधुरी तिखे, उपविभागीय अधिकारी, भंडारा

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत