Nagraj Manjule : नागराज मंजुळे यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सिनेमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या जातीभेदाबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपटांमधून समाजातील वास्तव प्रभावीपणे मांडलं आहे. त्यांच्या ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांनी केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं नाही, तर जातव्यवस्था, सामाजिक विषमता आणि माणसामाणसांमधील भेदाभेद यांसारख्या गंभीर विषयांवरही प्रकाश टाकला. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी ‘माणूस जात शोधून काढतोच’ असं म्हटलं आहे.
मुलाखतीदरम्यान, नागराज मंजुळे यांना ‘सिनेमांमध्ये पात्रांची आडनावं ठेवताना विचार करावा लागतो का?’ असं विचारलं असता नागराज मंजुळे म्हणाले की, ‘आपल्याकडे खूप शिताफीनं जे महत्त्वाचं आहे तेच लपवलं जातं. मी बालपणापासून इतकी वर्षे जे सिनेमे पाहतोय त्यात बहुतेकवेळा दाखवलं जातं की, नायक-नायिका प्रेमात पडतात आणि नंतर घरचे परवानगी देत नाहीत. का तर? त्या दोघांपैकी एकजण गरीब असतो आणि दुसरा श्रीमंत. यापेक्षा वेगळं काहीच नसतं. पण, यामागे श्रीमंत आणि गरीब हे एवढंच कारण नाहीये. मग मला लक्षात आलं की, यामध्ये जात असते…जातीची आडनावं असतात.’
Prasad Oak : पक्ष आणि विचारधारा हा मुद्दा नव्हताच, जीव ओतून भूमिका केली, ना शिंदेंकडून त्रास, ना ठाकरेंकडून; ‘धर्मवीर’बद्दल प्रसाद ओकचं वक्तव्य नागराज मंजुळे पुढे म्हणाले की, ‘मला ते ‘नमक हलाल’ सिनेमातील गाणं आठवतंय. ‘के पग घुंघरू बांधे’ या गाण्यात एक वाक्य आहे, ‘क्या देश है…क्या जात है…क्या उम्र है…क्या नाम है..अरे छोड़िये इन बातों से…हमको भला क्या काम है’ मला हे गाणं ऐकून असं झालं, अरे प्रश्न विचारा. हिंदी सिनेमांमध्ये असंच आहे, तिथपर्यंत आले पण महत्त्वाचा प्रश्नच विचारला नाही. ‘अरे छोड़िये इन बातों से…हमको भला क्या काम है’ असं बोलून तो विषय बंद केला. आपण कुरुप, दुखऱ्या वास्तवाला मुलामा लावून श्रीमंत आणि गरीब किंवा काहीतरी वेगळंच दाखवतो. म्हणूनच मला असं वाटलं की, आडनाव, नावं, व्यवसाय या गोष्टी सिनेमातून दाखवल्या पाहिजेत. आता बऱ्यापैकी समाजात सुधारणा होतेय. आता बरेच लोक आडनाव न दाखवता फक्त स्वतःचं नाव किंवा स्वत:चं अन् वडिलांचं नाव लावतात. पण, अलीकडची माणसं समोरच्याचं आडनाव शोधूनच काढतात.’
सैराटनंतर नागराज मंजुळेंचा सल्ला ते घरच्यांपासून लपवून केलेलं कोर्ट मॅरेज, अरबाज-सिमरन सोबत गप्पा
‘आता मी माझं नाव नागराज पोपटराव सांगितलं आणि आडनाव मुद्दाम लपवलं तर मग माणसं स्वत:हून विचारतात तुम्ही कुठले? यावर दलित साहित्यात बऱ्याच छान कविता सुद्धा आहेत. माणूस जात शोधून काढतोच. म्हणजे एखाद्याने आडनाव सांगितलं तरी, त्यांचे पाहुणे वगैरे सगळं विचारून घ्यायचं. शेवटी मग समोरच्याला समजतं की कोण कुठलंय.’ असं नागराज यांनी शेवटी सांगितलं. ‘एबीपी माझा’च्या ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा