Pakistani Actresses Viral Video On Indian Song : पाकिस्तानी अभिनेत्रींनी भारतीय देशभक्तीवर गाण्यावर व्हिडिओ शेअर केला असून अभिनेत्रींना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – पाकिस्ताननं १४ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्यानिमित्तानं अनेक पाकिस्तानी कलाकारांनीही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. मात्र, काही पाकिस्तानी अभिनेत्रींचा एक व्हिडिओ समोर आल्यानं सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्रींनी पाकिस्तानी ध्वज हातात धरलेला दिसत असून एक देशभक्तीपर बॉलिवूड गाणं लावण्यात आलं आहे. हे भारतीय गाणं असल्यामुळे अभिनेत्रींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
अभिनेत्रींचा व्हायरल व्हिडिओ
पाकिस्तानातील काही अभिनेत्रींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेत्रीनं शेअर केलेल्या रीलमध्ये भारतीय गाण्याचा वापर केल्यानं या अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रींनी हातात पाकिस्तानचा झेंडा घेऊन रील शेअर केली आहे. या व्हिडिओतून त्यांनी चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण, त्यांनी पाकिस्तानी गाण्यावर रील न बनवता भारतीय देशभक्तीपर गाण्यावर रील बनवली आहे. आलिया भट्ट ‘राझी’ सिनेमातील ‘ए वतन…मेरे वतन…आबाद रहे तू…’ या गाण्यावर पाकिस्तानी अभिनेत्री पाकिस्तानचा झेंडा फडकवताना दिसतायत.
Prasad Oak : पक्ष आणि विचारधारा हा मुद्दा नव्हताच, जीव ओतून भूमिका केली, ना शिंदेंकडून त्रास, ना ठाकरेंकडून; ‘धर्मवीर’बद्दल प्रसाद ओकचं वक्तव्य एका पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरनं या अभिनेत्रींचा व्हिडिओ शेअर केला असून तो म्हणतोय की, ‘पाकिस्तानी अभिनेत्री ज्या गाण्यावर देशाचा झेंडा फडकवत आहेत ते गाणं आलिया भट्टच्या ‘राझी’ सिनेमातील आहे आणि हा सिनेमा एक अँटी पाकिस्तानी सिनेमा होता. भारताच्या देशभक्ती गाण्यावर तुम्ही व्हिडिओ बनवायला नको होता, एवढं तरी तुम्हाला कळायला पाहिजे होतं. या सर्व नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. तुम्हाला या गोष्टी माहित असायला हव्यात. भारतातील इन्फ्लुएनसर्स आपली खिल्ली उडवत आहेत.’
व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नेटकऱ्यांनीही अभिनेत्रींना ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांनी म्हटलं की, ‘पाकिस्तानी लोक भारतीय गाण्यांनी इतके प्रभावित झाले आहेत की, ते स्वातंत्र्यदिनीसुद्धा बॉलिवूड गाण्यांचा वापर करत आहेत.’ ‘पाकिस्तानमध्ये बॉलिवूड गाण्यांबद्दल प्रचंड आकर्षण आहे.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा