![]()
गांधी परिवारावर होत असलेल्या टीकेवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. गांधी परिवाराच्या देशासाठीच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून टीका करणे योग्य नाही, असे म्हणत पटोले यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “गांधी परिवारावर टीका करणे म्हणजे थेट सूर्यावर थुंकण्यासारखे आहे,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. “स्वातंत्र्यलढ्यात तुमचा सहभाग काय?” भाजपच्या नेत्यांनी दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी आपल्या मुळाकडे, म्हणजेच आरएसएसकडे वळून पाहिले पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आरएसएसचा कोणताही सहभाग नव्हता, याकडे लक्ष वेधत त्यांनी भाजपच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. “५२ वर्षे तिरंगा फडकवला नाही” देशाच्या राष्ट्रध्वजाबाबत संघाच्या भूमिकेवर बोट ठेवत पटोले यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “या लोकांनी सलग ५२ वर्षे देशाचा तिरंगा फडकवला नाही. उलट, याच तिरंग्याला त्यांनी ‘अपशकुनी’ म्हटले होते.” ज्यांनी देशाच्या झेंड्याचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा सन्मान केला नाही, त्यांना काँग्रेसच्या किंवा गांधी परिवाराच्या देशभक्तीवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. “आधी स्वतःचे देशप्रेम तपासा” गांधी कुटुंबाने देशासाठी दिलेले बलिदान आणि योगदान मोठे आहे, असे सांगत पटोले यांनी भाजपला खडेबोल सुनावले. “स्वतःचा इतिहास लपवून केवळ गांधी परिवाराला लक्ष्य करण्यापेक्षा, भाजपच्या लोकांनी आधी स्वतःचे देशप्रेम किती आहे हे तपासून पाहावे. दुसऱ्यांवर नुसते बोलण्यापेक्षा कृतीतून देशभक्ती सिद्ध करावी,” असा इशारा नाना पटोले यांनी दिला. हेही वाचा.. रस्त्याची दुरवस्था दाखवणाऱ्या रायगडच्या शाळकरी मुली थेट राज ठाकरेंच्या भेटीला: व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासन जागं, तात्पुरता रस्ता तयार गावातील रस्त्याची दुरवस्था दाखवण्यासाठी शाळकरी मुलींनी तयार केलेला एक साधा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो राज्यभरात व्हायरल झाला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला. या धाडसी विद्यार्थिनींच्या प्रयत्नाचे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कौतुक केले आहे. रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील या तीन विद्यार्थिनींनी मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी तिन्ही मुलींचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. सविस्तर वाचा
Source link
गांधी परिवारावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे:नाना पटोलेंचा भाजप-आरएसएसवर घणाघात
