Headlines

Nalasopara Chamunda Dairy Cake Brought for Birthday Claims a Lizard Found; मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक आणला, खाताच 8 जणांना विषबाधा, पाल आढळल्याचा दावा; नालासोपाऱ्यात काय घडलं?


Nalasopara Cake Lizard : नालासोपाऱ्यात केकमध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आलाय. केक खाल्ल्यानंतर 7 ते 8 जणांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nalasopara Cake Lizard
नालासोपारा चामुंडा डेअरी केकमध्ये पाल(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पालघर : वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये मृत पाल आढळल्याचा धक्कादायक दावा नालासोपाऱ्यात करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा केक खाल्ल्यानंतर 7 ते 8 जणांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली असून, त्यांना उपचारासाठी नालासोपारा येथील विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक आणला

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी समोर असलेल्या चामुंडा डेअरी येथील केक शॉपमधून केक खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना उपस्थितांनी केक खाण्यास सुरुवात केली. मात्र, केक खात असतानाच त्यामध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आला. केकमध्ये पाल दिसताच उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. विशेष म्हणजे, हा केक खाल्लेल्या काही जणांची त्यानंतर प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra TimesKeshav Upadhye : ‘वंदे मातरम्’ वेळी सोनिया गांधींनी खर्गेंसाठी खुर्ची मागितली, भाजपचा संताप, ‘गांधी घराण्याला संपूर्ण गायनाबाबत एवढी अस्वस्थता का?’

7 ते 8 जणांची तब्येत बिघडली

या घटनेनंतर7 ते 8 जणांना अस्वस्थ वाटूलागल्याची धक्कादायक बाब देखील उघडकीस आली आहे. त्यांना तातडीने विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. केकमध्ये मृत पाल आढळणं आणि त्यानंतर केक खाल्लेल्या व्यक्तींची प्रकृती बिघडणं यामुळे कुटुंबीयांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. मात्र, संबंधित व्यक्तींची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, याबाबत अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे केक खाल्ल्यामुळेच सर्वांची प्रकृती बिघडली का? याची वैद्यकीय तपासणी होणं आवश्यक आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe : हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सा

रुग्णांची नावे खालीलप्रमाणे

रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये उर्मिला वर्मा (वय 32), सलोनी गुप्ता (वय 16), सुदीक्षा शाह (वय 19), आफिया इद्रिस (वय 24), रुबी शाह (वय 40), शिव गुप्ता (वय 10), प्रियांश वर्मा (वय 2 वर्षे), परी यादव (वय 7 वर्षे), प्रिया वर्मा (वय 8 वर्षे), रुद्र शाह (वय 13 वर्षे) आणि प्राची यादव (वय 8 वर्षे) यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर केक नेमका कोणत्या परिस्थितीत तयार करण्यात आला? तो तयार करताना किंवा पॅकिंग करताना स्वच्छतेची योग्य काळजी घेण्यात आली होती का? केकमध्ये पाल कशी आली? तसेच संबंधित दुकानातून विक्री करण्यात आलेल्या इतर खाद्यपदार्थांची स्थिती काय आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेची अधिकृत पुष्टी आणि संबंधित प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आता या प्रकरणात नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा