Mini Mathur On Interfaith Marriage : अभिनेत्री मिनी माथुरनं दिग्दर्शक कबीर खानसोबत आंतरधर्मीय विवाह केला. याबद्दल अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी आंतरधर्मीय विवाह केला आहे. त्यापैकी दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेत्री-निवेदिका मिनी माथुर यांचं नातंही चर्चेत राहिलं आहे. दोघांनी प्रेमविवाह केला असून त्यांच्या लग्नाला आता २७ वर्षे झाली आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत मिनी माथुरनं त्यांच्या लग्नाच्या आठवणींसह सासरच्या कुटुंबाबद्दलही मनमोकळेपणानं भाष्य केलंय.
‘माझ्या आयुष्यातील तो आनंदाचा काळ होता’
मुलाखतीदरम्यान मिनीला तिच्या आणि कबीर खानच्या लग्नाचा एक फोटो दाखवण्यात आला. हा फोटो पाहून जुन्या आठवणींना उजाळा देताना अभिनेत्रीनं सांगितलं की, तो तिच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा काळ होता. मिनी म्हणाली की, ‘२७ वर्षांपूर्वीचा माझ्या लग्नातील फोटो आहे. सूर्यास्ताच्या वेळी काढलेला फोटो आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी काळ आहे. मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. त्यावेळी समाजातील वातावरण फार वेगळं होतं. हे आंतरधर्मीय लग्न होतं. मी माथुर समजातून येते आणि त्या समाजात माथुर फक्त माथुरबरोबरच लग्न करतात. पण तरी माझ्या आजूबाजूचं जग खूपच वेगळं होतं. प्रत्येक जण नवीन संस्कृतीचा स्वीकार करत होते आणि कबीरचं कुटुंब, माझ्या सासरचे लोक फार धार्मिक नव्हते.’
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
‘एक स्त्री म्हणून तुमच्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. तुम्ही आई असता, करिअरही करत असता आणि सगळ्या गोष्टी सावरत त्यात समतोल साधायचा असतो. त्यामुळे मधल्या काळात कदाचित मी माझा सयंम गमावला असेल, पण मला असं वाटतं की, प्रत्येक स्त्री यामधून जातं असते आणि यावेळी तिला समजून घेणाऱ्या पुरुषाची तिला गरज असते.’ असंही मिनी कबीरबद्दल बोलताना म्हणाली. ‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिनी माथुर बोलत होती.
Zee Marathi Serial : ‘Goodbyes Are Tough!’ ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका लवकरच गुंडाळणार गाशा, अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना दरम्यान, मिनी माथुरच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं अनेक लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. ‘इंडियन आयडॉल’ आणि ‘तोल मोल के बोल’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे ती घराघरात पोहोचली. तिनं अभिनय क्षेत्रातही काम केलं असून ‘माइंड द मल्होत्रा’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘कॉल मी बे’ मध्येही ती झळकली आहे. अलीकडेच मिनी ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आणि या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. दुसरीकडे, कबीर खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘चंदू चॅम्पियन’ यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा