Headlines

गॅस कनेक्शन होऊ शकतं सस्पेंड, लगेच करून घ्या E-KYC; सोप्या भाषेत समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया


देशातील सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही भारत गॅस, एचपी गॅस किंवा Indane गॅस यांकडून सेवा घेत असाल तर तुम्हाला ई-केवायसी करणे आवश्यक झाले आहे. देशात एक गैरसमज पसरला होता की ई-केवायसी करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2026 या तारखेला संपणार आहे. परंतु ही तारीख चुकीची असून 16 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी करण्याची मुभा देण्यात आली आहे, त्यामुळे जर तुम्ही अजून ई-केवायसी केली नसेल तर ती त्वरित करण्यात यावी अन्यथा काही परिणामांना सामोरे जाण्यास लागू शकते.

जर उद्यापर्यंत ई-केवायसी केली नाही तर…

जी मंडळी दिलेल्या मुदतीच्या आत ई-केवायसी करण्यात असक्षम ठरेल त्यांना भविष्यात काही परिणामांना सामोरे जावे लागू शकते. अशा मंडळींना LPG गॅस सिलेंडर डोमेस्टिक रेटमध्ये मिळवण्यात अडचण येऊ शकते. कदाचित त्यांना कमर्शियल रेटमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर घ्यावे लागेल किंवा त्यांचे एलपीजी कनेक्शन काही काळासाठी सस्पेंड केला जाईल. जर तुम्ही ई-केवायसी करण्यासाठी उद्याची तारीख चुकलात तर घाबरून जाण्याचे इतके कारण नाही कारण ई- केवायसी केल्यानंतर सस्पेंड करण्यात आलेले कनेक्शन पुन्हा सुरू करण्यात येईल किंवा तुम्हाला मिळणाऱ्या सर्व सुविधा पुन्हा पूर्ववत होतील.

अचानक ई-केवायसी करण्याचे काही विशेष कारण

डोमेस्टिक एलपीजीच्या गैरवापर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच बाजारात मिळणाऱ्या डुप्लिकेट किंवा फेक कनेक्शन वर आळा घालण्यासाठी ग्राहकांचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. त्यामुळे एलपीजी कंपन्यांनी ग्राहकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

अगदी घरबसल्याही करू शकता ई-केवायसी

जर तुम्हाला ऑनलाईन ई-केवायसी करायची असेल तर संबंधित एलपीजी कंपनीचा मोबाईल एप्लीकेशन उघडा. ॲप उघडल्यावर तिथे ई-केवायसी ऑप्शन निवडा. आधार कन्सेंट द्या. फेस ऑथेंटीकेशन झाल्यानंतर व्हेरिफिकेशन होईल आणि तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.

Maharashtra Timesघर भाडं भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरताय? सावध रहा! आधी होणारे नुकसान जाणून घ्याजर तुम्हाला ऑनलाईन ई-केवायसी करण्यात अडचण येत असेल तर जवळच्या संबंधित एलपीजी कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन प्रक्रियेचा लाभ घेऊ शकता.

Indane Gas च्या ग्राहकांनी लक्ष द्या

Indane Gas च्या ग्राहकांनी ऑनलाइन ई-केवायसीसाठी आधी IndianOil ONE App डाउनलोड करा. त्यानंतर संबंधित एलपीजी खात्याने लॉगिन करा. ई-केवायसी निवडा आणि आधार कन्सेंट देऊन फेस स्कॅन करवून घ्या. याने आधारच्या आधारे ग्राहकाची ओळख वेरिफाय होईल आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

HP Gas च्या ग्राहकांनी लक्ष द्या

HP Gas च्या ग्राहकांनी ऑनलाइन ई-केवायसीसाठी आधी HP Pay App डाउनलोड करा. त्यानंतर संबंधित एलपीजी खात्याने लॉगिन करा. ई-केवायसी निवडा आणि आधार कन्सेंट देऊन फेस स्कॅन करवून घ्या.

Bharat Gas च्या ग्राहकांनी लक्ष द्या

Bharat Gas च्या ग्राहकांनी ऑनलाइन ई-केवायसीसाठी आधी Hello BPCL App डाउनलोड करा. त्यानंतर संबंधित LPG खात्याने लॉगिन करा. ई-केवायसी निवडा आणि आधार कन्सेंट देऊन फेस स्कॅन करवून घ्या.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत