Headlines

Landlord Tenant Repair Responsibility; घरमालकांची मनमानी नाही चालणार; दुरुस्ती खर्चावरून वाद कॉमन पण, भाडेकरू कधी जबाबदार? हक्क अन् जबाबदाऱ्या समजून घ्या


Rental Property : घरमालक रंगकाम, दुरुस्ती, विजेची किंवा नळकामाचा खर्च मागतात अशी अनेक भाडेकरू तक्रार करतात. त्यामुळे, भाड्याच्या घरातील दुरुस्तीची जबाबदारी भाडेकरूची असते की घरमालकाची? नळ गळणे, भिंत खराब होणे किंवा एखादे फिटिंग तुटणे यांसारख्या गोष्टींमुळे भाडेकरू आणि घरमालक यांच्यात लवकरच वाद निर्माण होऊ शकतात. या वादांवर तोडगा काढणारे ‘मॉडेल टेनन्सी ॲक्ट, 2021’ किंवा आदर्श भाडेकरू कायदा केला गेला आहे.

भारतातील या कायद्यात भाड्याच्या घरातील लहानसहान गोष्टींचं दुरुस्तीसाठी कोण जबाबदार असेल, भाडेकरू दुरुस्तीचा खर्च भाड्यातून कधी वजा करू शकतो का आणि निष्काळजीपणामुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे भाड्याची मालमत्ता राहण्यायोग्य न राहिल्यास काय होते? यांबाबत स्पष्ट तरतुदी नमूद आहेत.

Maharashtra Times8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगारवाढ लांबणीवर; मे 2027 पर्यंत 18 महिने मुदत, मग अंमलबजावणीचा मुहूर्त? शिफारशी सादर केल्यावर पुढे काय समजून घ्या

भाड्याच्या घरातील दुरुस्तीस जबाबदार कोण?

भाडेकरू किंवा घरमालकाने नेहमी सर्व दुरुस्ती खर्च वाटून घ्यायचे असे नाही, तर दुरुस्तीच्या प्रकार, नुकसान सामान्य झीज-झडपामुळे झाले आहे की नाही यावर आणि भाडे कराराच्या अटींवर अवलंबून असते. उत्तर प्रदेश परिसर भाडेकरू नियमन कायदा, 2021, दुरुस्ती आणि देखभालीच्या जबाबदाऱ्या देखील खर्च कोण उचलणार हे निश्चित करते.

दैनंदिन वापरामुळे होणारी सामान्य झीज वगळता रेंट अग्रीमेंटच्या सुरुवातीला मालमत्ता जशी होती, साधारणपणे त्याच स्थितीत दोन्ही पक्षांनी ठेवणे अपेक्षित आहे.

पण काही विशिष्ट दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांची जबाबदारी घरमालकावर असते, तसेच ही कामे भाडेकरारामध्ये नमूद केलेली असू शकतात किंवा भाडेकरारात नमूद केलेले असू शकतात. व्यावहारिक दृष्ट्या घरमालकाच्या जबाबदारीत येणाऱ्या मोठ्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांकडे सहज दुर्लक्ष करता येत नाही.

Maharashtra TimesLakhpati Scheme: सरकारी हमी असलेली RD योजना; दरमहा फक्त 600 रुपये जमा करून 1 लाखांहून अधिक कमवा, 8 टक्केपर्यंत व्याजदर

भाड्याच्या घरातील रंगकामाचा खर्च कोण करणार?

सामान्य वापरामुळे कालांतराने घरातील भिंतींचा रंग फिका पडला किंवा खराब झाला असल्यास भाडे करार आणि लागू नियमांनुसार हा खर्च सामान्यतः घरमालकाच्या वाट्याला येऊ शकतो.

मात्र, भाडेकरूने जाणूनबुजून किंवा असामान्यपणे भिंत, दरवाजा किंवा इतर कोणत्याही वस्तूचे नुकसान केल्यास दुरुस्तीचा खर्च भाडेकरूला उचलावा लागू शकतो. भाडेकरू कायद्यानुसार भाडेकरूने घर साधारणपणे त्याच स्थितीत ठेवणे आवश्यक आहे, ज्या स्थितीत पहिल्यांदा भाड्याने घेतलेले. पण यामध्ये सामान्य झीजचा समावेश नाही.

किरकोळ दुरुस्तीचा खर्च कोण उचलेल?

किरकोळ, दैनंदिन दुरुस्तीची जबाबदारी भाडेकरारात नमूद असल्यास भाडेकरूला जबाबदारी उचलावी लागू शकते. पण मोठ्या किंवा अत्यावश्यक दुरुस्ती, जसे की इमारतीमधील किंवा मुख्य प्रणालींमधील बिघाड, ही सामान्यतः घरमालकाची जबाबदारी असते. त्यामुळे प्रत्येक दुरुस्तीचा खर्च भाडेकरूनेच उचलावा असे कायद्यात कुठेच नमूद नाही.

घरमालक प्रत्येक खर्चासाठी पैसे मागत असेल तर काय करावे?

सर्वप्रथम हा खर्च तुमच्या वाट्याचा आहे की नाही याबाबत घरमालकाला विचारा. त्यानंतर, भाडेकरार काळजीपूर्वक चेक करून दुरुस्तीशी संबंधित अटी तपासा. तसेच तुम्ही भाड्याच्या घराचा ताबा घेतल्यापासूनच्या वेळचे फोटो किंवा व्हिडिओ, दुरुस्तीची बिले आणि खर्चाचे कोटेशन्स जपून ठेवा.

यामुळे सामान्य वापरामुळे नुकसान झाले की नाही हे ठरवण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त घरमालकाशी ई-मेल किंवा सोशल मीडियावर लेखी स्वरूपात संवाद साधा, ज्यामुळे भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास तुमच्याकडे संभाषणाची नोंद राहील.

भाडेकरूने रिपेअरिंगचे पैसे देण्याआधी काय करावे?

घरमालक केवळ रंगकाम किंवा दुरुस्तीसाठी पैशाची मागणी करत असेल तर, लगेचच पैसे देऊ नका. सर्वप्रथम भाडेकरार वाचा आणि रंगकाम, दुरुस्ती, नुकसान भरपाई आणि सुरक्षा ठेवीसंबंधीबाबत नमूद केलेल्या अटी तपासा. तसेच घराचा ताबा घेतला तेव्हा काढलेल्या फोटोंची घराच्या सध्याच्या स्थितीशी तुलना करा.घरमालकाकडून लेखी बिल किंवा खर्चाचे कोटेशन मागा. रक्कम मोठी असेल किंवा वाद वाढत असल्यास भाडे रोखून धरण्याआधी किंवा कमी करण्याआधी प्रतिष्ठित मालमत्ता वकिलाचा सल्ला घ्या.

कोणत्या अटींनुसार खर्चाची जबाबदारी कोणाची?

कालांतराने भिंतींचा रंग फिका पडणे सहसा घरमालक
लहानसहान किंवा सामान्य झीज सहसा भाडेकरूची जबाबदारी नाही
भाडेकरूमुळे भिंतीचे झालेले नुकसान भाडेकरू
किरकोळ दररोजची दुरुस्ती भाडेकरू असू शकतो
मोठ्या दुरुस्तीची कामे सहसा घरमालक
रेंट अग्रीमेंटमध्ये भाडेकरूला दिलेल्या दुरुस्तीच्या तरतुदी भाडेकरू
भाडे करारात घरमालकाला दिलेल्या दुरुस्तीच्या तरतुदी घरमालक
प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत