Headlines

TATA Leadership Feud: एन. ‘चंद्रा’च्या राजीनाम्यामुळे TATA समूहात मोठं वादळ, सत्तासंघर्ष तीव्र, नोएल टाटा निवडणार साम्राज्याचा पुढचा किंगमेकर – tata group power struggle intensifies following n chandrasekaran resign noel tata will be decision maker


TATA Group Leadership : दिवंगत रतन टाटा भारतातील सर्वात मोठ्या उद्योग घराण्याचे चेहरा राहिले, तर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा अनेक वर्षे प्रसिद्धीझोतापासून दूर राहिले. मात्र, एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा निवडणूक न लढवण्याच्या निर्णयामुळे नोएल टाटा आता समूहाच्या पुढील नेतृत्व बदलाच्या केंद्रस्थानी आले आहेत.सर दोराबजी टाटा ट्रस्टने आता चंद्रशेखरन यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध प्रक्रिया सुरू केली आहे.

नोएल टाटांच्या नेतृत्वाखालील टाटा ट्रस्ट्सकडे टाटा सन्समधील अंदाजे 66% हिस्सा असून पुढील अध्यक्षांची निवड टाटा सन्सच्या नियमावलीनुसार एका औपचारिक समितीद्वारे केली जाणार असली तरी, यामुळे नवीन अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका निर्णायक असेल. या घडामोडीमुळे टाटा समूहातील नोएल टाटांच्या प्रवास आणि त्यांच्या व्यवस्थापन शैलीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले, ज्यांनी आतापर्यंत स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवलेले.

Maharashtra TimesN Chandrasekaran Successor: टाटा समूहात नव्या ‘चंद्रा’चा शोध, उत्तराधिकारीबाबत चिंता; टाटा सन्सच्या नवीन बॉसच्या शर्यतीत कोण-कोण?

नोएल टाटा कोण?

12 नोव्हेंबर 1956 रोजी नवल आणि सिमोन टाटांच्या पोटी जन्मलेल्या नोएल यांनी ससेक्स विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आणि नंतर INSEAD येथे आंतरराष्ट्रीय एगजीक्यूटिव्ह शिक्षण पूर्ण केले. ब्रिटनमधील नेस्लेमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि मग टाटा इंटरनॅशनलमध्ये रुजू झाले. नंतर ट्रेंटचे नेतृत्व केले, जो टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या ग्राहक व्यवसायांपैकी बनला.

नोएल टाटांच्या नेतृत्वातील ट्रेंटची वाढ छोट्या दुकानाच्या किरकोळ विक्रेत्यापासून 700 हून अधिक दुकानांच्या व्यवसायापर्यंत झाली, ज्याच्या विस्तारात वेस्टसाइड आणि झुडिओ सारख्या ब्रँड्सनी महत्त्वाची भूमिका बजावली. नोएल टाटा अध्यक्ष म्हणून पायउतार होत असताना कंपनीचा महसूल 20000 कोटींच्या पुढे गेला होता.

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार 2010 ते 2021 या काळात नोएल व्यवस्थापकीय संचालक असताना कंपनीचा महसूल सुमारे 500 दशलक्ष डॉलर्सवरून 3 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झालेला.

Trent Share Price Noel Tata
नोएल टाटा

चंद्रशेखरन यांची जागा कोण घेणार ?

टाटा समूहातील सध्याच्या परिस्थितीत उद्भवणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, चंद्रशेखरन यांच्यानंतर समूहाचे नेतृत्व कोणी करावे, अशी नोएल टाटा आणि टाटा सन्सच्या मंडळाला वाटतं किंवा इच्छित आहे.

चंद्रशेखरन यांनी आपल्या कार्यकाळात सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, विमान वाहतूक आणि डिजिटल व्यवसाय यांसारख्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून जवळपास दशकभर टाटा समूहाला नव्याने आकार दिला. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकारीला वारसा म्हणून असे प्रकल्प मिळतील जे आधीच निर्णायक टप्प्यावर आहेत, तसेच मोठ्या भांडवल आणि स्पष्ट पुनरुज्जीवन धोरणाची आवश्यकता असेही व्यवसाय वाट्याला येतील.

नोएल टाटा सर्वोच्च पद का स्वीकारू शकत नाही?

नोएल टाटांनी सुरुवातीला फेब्रुवारी 2027 नंतर तिसऱ्यांदा 5 वर्षांसाठी चंद्रशेखरन यांना पाठिंबा दिला होता, मात्र त्यानंतर समूहातील अनेक कंपन्यांची कामगिरी, प्रचंड भांडवली खर्च आणि समूहाची व्यापक रणनीती यांबाबत प्रश्न उपस्थित करू लागले. कंपनीच्या ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’मधील कलम 118 मुळे नोएल टाटा टाटा सन्सचे अध्यक्ष बनू शकत नाही. ऑगस्ट 2022 मध्ये भागधारकांनी या कलमात सुधारणा करून एकाच व्यक्तीकडे दुहेरी अध्यक्षपद असण्यावर स्पष्ट बंदी घातलेली.

टाटा स्टीलचे MD बनणार नवे प्रमुख?

आता सर्वांच्या मनात मुख्य प्रश्न हाच आहे की, चंद्रशेखरन यांची जागा कोण घेणार? फेब्रुवारी 2027 पर्यंत अध्यक्षपदी कायम राहणे अपेक्षित आहे, ज्यामुळे टाटा सन्सला नेतृत्व बदलाचे नियोजन करण्यास काहीसा वेळ मिळेल. अशा स्थितीत, चंद्रशेखरन यांच्या जागी चर्चेत असलेल्या नावांमध्ये 61 वर्षीय टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन आहेत.

कोण आहेत TV नरेंद्रन

1988 मध्ये टाटा ग्रुपमध्ये सामील झालेले नरेंद्रन भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहातील अनुभवी अधिकारी आहेत. चंद्रशेखरन यांच्याप्रमाणेच नरेंद्रन यांनी टाटा समूहात आपली अख्खी कारकीर्द व्यतीत केली असून 2013 पासून टाटा स्टीलचे नेतृत्वात करत आहेत. नोएल सध्या टाटा स्टीलचे उपाध्यक्ष आहेत, तर नरेंद्रन यांनी दिवंगत रतन टाटांचे ‘मार्गदर्शक’ म्हणून वर्णन केले, ज्यांनी परिवर्तनाच्या कठीण काळात या स्टील कंपनीला दिशा दाखवली.

मात्र, नोएल टाटांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आणि नेतृत्वातील बदलाची कोणतीही तयारी समूहाने केलेली नाही. पण, नोएल यांच्याशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, नरेंद्रन ‘नोएल यांच्या मुख्य टीमचा भाग असू शकतात.’