Headlines

Zee Marathi Serial : ‘Goodbyes Are Tough!’ ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका लवकरच गुंडाळणार गाशा, अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना


Zee Marathi Serial Going To Off Air : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याबद्दल अभिनेत्रीनं पोस्ट करत माहिती दिली आहे.

Shubh Shravani Serial Going To Off Air
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – टीआरपीच्या यादीत टिकून राहण्यासाठी छोट्या पडद्यावर अनेक प्रयोग केले जातात. जुन्या मालिका संपवून नव्या मालिका सुरू केल्या जातात. तर काही वेळेस मालिकांमध्ये नवीन पात्र आणली जातात. अशातच आता झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यासंबंधी अभिनेत्रीनं पोस्ट शेअर केली आहे.

‘ शुभ श्रावणी ‘ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार

झी मराठीवर काही महिन्यांपूर्वी ‘शुभ श्रावणी’ ही मालिका सुरू झालेली. या मालिकेत वल्लरी विराजनं श्रावणीची भूमिका साकारलेली. तर सुमित पाटीलनं शुभंकर म्हणजेच शुभूची भूमिका साकारली होती. आता ‘शुभ श्रावणी’ ही मालिका संपणार आहे. मालिकेत श्रावणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वल्लरी विराजच्या एका पोस्टमुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

अभिनेत्रीची भावुक पोस्ट

वल्लरी विराजनं सोशल मीडियावर मालिकेतील श्रावणीच्या भूमिकेतील एक भावुक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मालिकेच्या सेटवर बसलेली दिसत असून, पोस्टसोबत ‘श्रावणीसोबत शेवटचा दिवस’ असं लिहिलं आहे. त्यासोबतच ‘निरोप घेणं कठीण असतं, मग तुमची त्यासाठी कितीही तयारी असली तरीही.’ असंही अभिनेत्रीनं भावुक होत म्हटलं आहे. अभिनेत्रीची पोस्ट पाहून प्रेक्षकांना धक्का बसला आहे. अवघ्या सात महिन्यात ही मालिका गाशा गुंडाळणार आहे. मात्र, मालिकेच्या अंतिम भागाची किंवा ऑफ एअर होण्याची अधिकृत घोषणा वाहिनीकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे मालिका संपण्याचं नेमकं कारण काय असेल? आणि त्या जागी कोणती नवी मालिका सुरू होणार, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Vallari Viraj Post

‘शुभ श्रावणी’ ही मालिका १९ जानेवारी २०२६ पासून झी मराठीवर सुरू झाली होती. ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित होते. या मालिकेत वल्लरी विराजसोबत लोकेश गुप्ते, आसावरी जोशी यांसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.

Maharashtra TimesSunita Ahuja : ‘लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, त्याला लाज वाटली पाहिजे’, गोविंदावर भडकली सुनीता अहुजा, काय घडलं?
दरम्यान, वल्लरी विराजच्या कामाबद्दल बोलायचं तर तिनं ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेली.