Raigad Alibaug Woman fell Down on Bike Held 20 Day Old Baby Tightly her Chest; बाईक अचानक थांबली, आई खाली कोसळली, 20 दिवसांचं लेकरु छातीशी घट्ट; रायगडमध्ये मातृत्त्वाची हृदयस्पर्शी कहाणी
Raigad Alibaug Woman fell Down on Bike Held 20 Day Old Baby Tightly her Chest; बाईक अचानक थांबली, आई खाली कोसळली, 20 दिवसांचं लेकरु छातीशी घट्ट; रायगडमध्ये मातृत्त्वाची हृदयस्पर्शी कहाणी
Raigad News : रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नागाव येथून खरेदी करुन येत असताना एक महिला बाईकवरुन खाली कोसळली पण तिने आपल्या 20 दिवसांच्या लेकराला छातीशी घट्ट धरुन ठेवलं.
अलिबाग नागाव बाईकवरुन महिला खाली कोसळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : नागाव येथून पती आणि मुलांसह खरेदीसाठी अलिबाग शहरात आलेल्या एका महिलेच्या बाबतीत घडलेल्या अपघातात आईच्या ममतेचे हृदयस्पर्शी दर्शन घडलं. बाईक अचानक बंद पडल्यानं मागे बसलेली गीतांजली सचिन शर्मा रस्त्यावर पडून जखमी झाल्या. मात्र, खाली पडतानाही त्यांनी अवघ्या 20 दिवसांच्या बाळाला छातीशी घट्ट कवटाळून ठेवलं. त्यामुळे बाळाला कोणतीही इजा झाली नाही. विशेष बाब म्हणजे, तीन वर्षांची मुलगीही त्यांच्यासोबत होती.
नेमकं काय घडलं?
सचिन शर्मा हे आपली पत्नी गीतांजली आणि आपल्या दोन्ही मुलांसह नागावहून बाईकवरून अलिबाग येथे खरेदीसाठी आले होते. अलिबाग शहरातील स्मार्ट बाजार परिसरात पोहोचल्यानंतर त्यांच्या बाईकमध्ये अचानक बिघाड झाला आणि वाहन थांबलं. यावेळी मागे बसलेल्या गीतांजली यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर कोसळल्या. या अपघातात त्यांना दुखापत झाली आणि त्या काही काळ बेशुद्ध झाल्या.
Mumbai Crime : दारुला पैसे दिले नाहीत, मुंबईकर नातवाची 93 वर्षांच्या आजीला धमकी, लॉक लावून पळाला, वृद्धेचा करुण अंत मात्र, अपघाताच्या क्षणीही त्यांनी आपल्या 20 दिवसांच्या चिमुकल्याला छातीशी घट्ट धरून ठेवलं. स्वतः जखमी होऊनही बाळाला काही होऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली. या घटनेने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. घटनेची माहिती अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांना मिळताच त्यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी आपले अंगरक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर यांना घटनास्थळी पाठवून जखमी गीतांजली शर्मा यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.
यावेळी मोरेश्वर भगत, निखिल तबीब, भूषण मोरे, निशांत कांबळी आणि अमुलकुमार भलगट यांनीही मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला वेळेत उपचार मिळू शकले. दरम्यान, गीतांजली शर्मा यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी भाकरवड येथील पत्रकार जीवन पाटील यांनी आपली रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध करून दिली. तसेच जखमी महिलेच्या औषधोपचाराचा खर्चही त्यांनी स्वतः उचलला.
गीतांजली शर्मा यांच्या या घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेची आठवणही ताजी झाली. पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबाची बोट तलावात बुडाल्यानंतर एका महिलेनं आपल्या लेकराला शेवटपर्यंत पोटाशी घट्ट धरून ठेवलं होतं. स्वतःचा जीव धोक्यात असतानाही लेकराला सोडून न देणाऱ्या त्या मातेची घटना त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.
अलिबागमधील घटनेतही आईने स्वतःच्या वेदनांपेक्षा बाळाच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं. ‘आई’ या नात्याची ताकद आणि माया कोणत्याही संकटापेक्षा मोठी असते, याची प्रचिती देणारी ही घटना ठरली आहे. अपघातग्रस्त महिलेला मदत करण्यासाठी नागरिकांनी दाखविलेली तत्परता आणि पत्रकार जीवन पाटील यांनी केलेली मदत यामुळे या प्रसंगातून माणुसकीचेही दर्शन घडले.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा