बेकायदेशीर नेटवर्कद्वारे दरवर्षी 40 अब्ज ते 303 अब्ज डॉलर्स किमतीचा माल चीनमधून इतर देशांमार्गे अमेरिकेत पोहोचत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तर, आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर केला जाईल, असेही या अहवालात म्हटले.
Gold Silver Price Fall: श्रावणच्या सुरुवातीसह सोन्याच्या भावात मोठा बदल, चांदीच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण; पाहा आजचा रेटनेमकं प्रकरण आहे काय?
अमेरिकेचा आरोप आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा चीनमधील एका खरखान्यात एखादे उत्पादन तयार होते, जे थेट अमेरिकेत पाठवले तर, त्यावर मोठा आयात कर लादला जाईल. अशा परिस्थितीत, व्यावसायिक उत्पादन थेट चीनमधून अमेरिकेत पाठवण्याऐवजी आधी एका तिसऱ्या देशात पाठवतो जिथे पॅकेजिंग बदलले जाते, नवीन लेबल लावले जाते, बिलात फेरफार केला जातो किंवा कागदपत्रांमध्ये इतर काही किरकोळ बदल केले जातात, जेणेकरून उत्पादन चीनमधून नव्हे, तर या तिसऱ्या देशातून आल्याचे दिसते.
अशाप्रकारे, हाच माल अमेरिकेला पोहोचल्यावर चीनवर लादलेल्या भरमसाठ टॅरिफच्या जागी त्यावर कमी शुल्क आकारले जाते. हा खेळ आता खूपच जास्त प्रमाणात पसरल्याचे अमेरिकेचा आरोप आहे.व्हाईट हाऊसच्या व्यापार आणि उत्पादन धोरण कार्यालयाने, ऑगस्ट 2026 मध्ये ‘द ग्रेट ट्रान्सशिपमेंट स्कॅम’ नावाच्या आपल्या अहवालात दावा केला आहे.\
EPF Pension Calculator: 15 वर्षे प्रायव्हेट नोकरी, 10,000 ते 15000 सॅलरीवर इतकी मिळेल पेन्शन, या फॉर्म्यूल्याने करा कॅलक्युलेटअमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाची भाषा बरीच कठोर आहे. यामध्ये अवैध मालवाहतुक, म्हणजेच तिसऱ्या देशामार्फत बेकायदेशीरपणे माल पाठवणे आणि त्याची खरी ओळख लपवणे, याला तस्करीचा प्रकार म्हटले आहे. पण सर्वात रंजक गोष्ट म्हणजे की, अमेरिकेने या धोक्याशी जोडलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश केला आहे.
“एखादा चिनी पंप पुण्यातून भारतीयांच्या गर्दीत बाहेर पडत असेल, तर पंप सिनसिनाटी, डेटन किंवा कोलंबसमध्ये बनलेला नव्हता,”
असे नवारो म्हणाले.
अहवालानुसार वापरलेली पद्धत आणि व्याख्येनुसार दरवर्षी इतर देशांमार्फत बेकायदेशीर पाठवल्या जाणाऱ्या अशा मालाचे मूल्य 40 अब्ज डॉलर ते 303 अब्ज डॉलरच्या दरम्यान असू शकते.
पीटर नवारो काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी चीन अमेरिकेच्या आयात शुल्कापासून वाचण्यासाठी तिसऱ्या देशांचा वापर करत असल्याचा दावा केला. या देशांमध्ये भारताव्यतिरिक्त मेक्सिको, कॅनडा, युरोपियन युनियन, जपान आणि दक्षिण कोरिया यांचाही समावेश आहे.
या अहवालाचा संदर्भ देत पत्रकारांशी बोलताना पीटर नवारो म्हणाले, “वर्षानुवर्षे या मोठ्या ट्रान्स-शिपमेंट घोटाळ्यामुळे कम्युनिस्ट चीनला भारत, मेक्सिको, कॅनडा आणि युरोपियन युनियनसह 40 हून अधिक देशांमार्फत आपली निर्यात वैध ठरवता आली ज्यामुळे चिनी कंपन्यांना अमेरिकेने लादलेले उच्च आयात शुल्क टाळता येते.”
भारतावर अमेरिकेचे आरोप काय?
भारत चिनी मालाला भारतीय माल म्हणून भासवून कधी भारतात साध्या प्रक्रियेद्वारे तर कधी पॅकेजिंग आणि लेबलिंगद्वारे चुकीच्या पद्धतीने सादर करत आहे आणि नंतर अमेरिकन बाजारात पाठवतो, असे ट्रम्प यांच्या जवळच्या व्यक्तीने दावा केला असून पुणे-गुजरात-चेन्नई उत्पादन पट्ट्यातून अमेरिकेत येणारे पंप आणि कंप्रेसर चिनी माल असून भारत तो स्वतःचा म्हणून विकत असल्याचाही दावा केला आहे.

