७ ऑगस्ट २०२६ च्या शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर एकापेक्षा एक धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज झाल्या.
नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओआणि झी५ (Zee5) यांसारख्या प्रमुख प्लॅटफॉर्म्सवर अॅक्शन, वॉर ड्रामा, रोमान्स आणि थ्रिलरने भरलेल्या ७ नवीन कलाकृती भेटीस आल्या आहेत.
१. ऑपरेशन सफेद सागर
वॉर आणि अॅक्शन ड्रामा असलेली ही वेब सीरिज आहे. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलानं राबवलेल्या ऐतिहासिक लष्करी मोहिमेवर आधारित हीदेशभक्तीपर सीरिजआहे. सिद्धार्थ, जिमी शेरगिल आणि अभय वर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेली ही सीरिज हवाई दलाच्या शूरवीरांचा थरारक प्रवास दाखवतो. सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
२. मै वापस आऊंगा
इम्तियाज अलीदिग्दर्शित हा चित्रपट १९४७ च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला. प्रेक्षक तसंच समीक्षकांनाही सिनेमाचं कौतुक केलं आहे. यात नसरुद्दीन शाह, दिलजीत दोसांझ, शर्वरी वाघ आणि वेदांग रैना या कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
३. द सुपर मारिओ गॅलक्सी मूव्ही
थिएटर्समध्ये तुफान यश मिळवल्यानंतर हा अॅनिमेटेड ब्लॉकबस्टर चित्रपट आता जिओहॉटस्टारवर उपलब्ध झाला आहे. मारिओ, लुईगी आणि त्यांचे मित्र प्रिन्सेस रोझालिनाला वाचवण्यासाठी अवकाशात एका नव्या थरारक मोहिमेवर निघतात.
४. वधांधी- सीझन २
पहिल्या सीझनच्या प्रचंड यशानंतर ‘वधांधी’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. एम. ससीकुमार यांच्या मुख्य भूमिकेतील ही क्राईम थ्रिलर सीरिज एका पोलीस अधिकाऱ्याच्या आणि ग्रामीण भागातील एका गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या तपासाभोवती फिरते. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर ही सीरिज पाहता येईल.
अखिल अक्किनेनीची मुख्य भूमिका असलेला हा तेलगू अॅक्शन चित्रपट झी५ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. तीन दशकांची कहाणी आणि गावातील राजकीय-कौटुंबिक संघर्षाची नाट्यमय पार्श्वभूमी प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
६. अवर स्टिकी लव्ह
के-ड्रामा प्रेमींसाठी हा १२ भागांचा एक उत्कृष्ट रोमँटिक शो आहे. जंग हे-इन आणि हा-यंग यांच्या मुख्य भूमिका असलेला हा शो स्मृतीभ्रंश झालेल्या एका सरकारी वकिलाची आणि तिचे रक्षण करणाऱ्या बॉक्सिंग कोचची गोड आणि रंजक प्रेमकथा दाखवतो.
Salman Khanच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू
Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद
७. तुंबडची मंजुळा
झी५ वर तुंबाडची मंजुळा‘ हा हॉरर-कॉमेडी मराठी चित्रपट रिलीज झाला आहे. कोकणातील गूढ वातावरण, मालवणी बोलीचा गोडव आणि त्याला मिळालेली भयपट अन् विनोदाची जोड यामुळं ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची सिनेसृष्टीत चर्चा झाली.
विविध कोरगावकर दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना एका अनोख्या, थरारक आणि तितक्याच मनोरंजक सफरीवर घेऊन जातो.
८. भारत भाग्य विधाता
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेला आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील परिचारिकांच्या धैर्यावर आधारित ‘भारत भाग्य विधाता’ हा बहुचर्चित चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्ट्रीम होणार आहे.
९. द महाराष्ट्र फाईल्स
उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, या लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका असलेला द महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमाही आता अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध झाला आहे.
१०.तर नेटफ्लिक्सवर ‘द लास्ट हाऊस’ हा थरारक सायं-फाय हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला असून थ्रिलर आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरत आहे.
११.गव्हर्नर:
तसंच जून महिन्यात प्रदर्शित झालेला ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ हा सिनेमाही तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. १९९० च्या दशकातील भारताच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटावर आणि देशाची अर्थव्यवस्था सावरणार्या रिझर्व्ह बँकेच्या तत्कालीन गव्हर्नर एस. वेंकटरमणन यांच्या योगदानावर हा सिनेमा आधारित आहे. अॅमझॉन प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा पाहता येईल.
तर बटवारा १९४७ हा सिनेमा या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी देओल (‘सिकंदर मिर्झा’च्या कणखर भूमिकेत), शबाना आझमी (‘दुर्गावती देवी’), प्रीती झिंटा (‘हमीदा बेगम’), अली फझल, अभिमन्यू सिंग आणि करण देओल महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

