Headlines

रोहित शर्माचा शो अन् निवृत्तीचे संकेत, वर्ल्ड कप 2027 खेळणार की नाही? जाणून घ्या?


Rohit Sharma News :भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या निवृत्तीच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता तसं कारणही असून हिटमॅनच्या शो मुळे पुन्हा एकदा या बातम्यांनी जोर पकडलाय. नेमक कशामुळे ते जाणून घ्या.

Rohit Sharma
Rohit Sharma(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघाने पुढील वर्षीच्या वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने संघबांधणी सुरू केली आहे; पण यात अनुभवी फलंदाज अन् माजी कर्णधार रोहित शर्माचा समावेश असण्याची शक्यता मात्र कमी दिसते. मध्यंतरी लॉर्ड्सवरील इंग्लंडविरुद्धची वन-डे क्रिकेट लढत रोहितच्या निरोपाची लढत असेल, असे वृत्तही आले होते. आता बुधवारी आलेल्या आणखी एका वृत्ताने रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याच्या शक्यतेला खतपाणी घातले गेले आहे.

आपल्या ‘सोनी नेटवर्क’ ने आगामी कार्यक्रमांची घोषणा केली. रोहित शर्मा आपल्या स्वतःच्या कार्यक्रमाद्वारे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे ‘सोनी’नेच म्हटले आहे. आयपीएलमधील अपयश आणि गेल्या सहा सामन्यांत एक अर्धशतक आणि एक शतकी खेळी सोडल्यास रोहितला प्रभाव पाडता आलेला नाही. यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संघव्यवस्थापन आणि अजित आगरकर यांची निवड समिती रोहित शर्माच्या पुढे विचार करू लागल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. मात्र, बीसीसीआयमधील पदाधिकाऱ्यांनी रोहितला मिळत असलेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनीच सांगितले होते.

रोहित वर्ल्ड कप खेळणार की नाही?

भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा हा आगामी वर्ल्ड कपमध्ये खेळेल अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र रोहितने अनेकदा बोलूनही दाखवले आहे. पण आता रोहित खेळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. रोहितने भारतासाठी आतापर्यंत तीन वर्ल्डकप खेळले असून यामधील एक वर्ल्ड कपमध्ये त्याने कर्णधारपदही भूषवले आहे. वर्ल्ड कप २०२३ मध्ये संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला होता. मात्र फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत विजेतेपदार नाव कोरले होते. त्यानंतर झालेला टी-२० वर्ल्ड कप भारताने जिंकला, पण रोहितची इच्छा आहे की त्याला वनडे वर्ल्ड कप जिंकायचा आहे. २०११ वेळी रोहितला भारतीय संघाता जागा मिळाली नाही. पण त्यानंतर भारताला एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. आता २०२७ शेवटची आशा आहे पण त्यासाठी रोहित संघात राहतो की नाही याबाबत काहीही निश्चित नाही.

Maharashtra TimesIND vs SL Test : भारत-श्रीलंका कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी, अज्जू नव्या इनिंगसाठी सज्ज; जाणून घ्याविराट कोहलीलाही आपल्या नेतृत्त्वात वर्ल्ड कप जिंकण्यात अपयश आले होते. विराट २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. मात्र त्यानंतर २०१५ ला धोनी, तर विराट कर्णधार असताना २०१९ मध्ये भारताचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे विराटचीही वन डे वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा अधुरीच राहिली आहे. दोघांनीही वर्ल्ड कप खेळावा अशी सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.

Maharashtra TimesHardik Pandya IPL Trade : हार्दिकसाठी KKR, CSKची MIसोबत बोलणी; पण पांड्याच्या मनात दुसरंच, अख्खा ट्रेड प्लॅनच लीक, एकाच अटीचा ख्वाडा!
दरम्यान, लॉर्ड्सवरील सामना शेवटचा असल्याची अफवा उडाली होती. रोहितचे आई-वडीलसुद्धा हा सामना पाहायला आल्याने सर्वांच्या मनातील भीती वाढली होती. परंतु तसे काही झाले नाही. निवड समितीवरही दबाव वाढला होता. मात्र अद्यापही रोहित खेळणारच असे अधिकृतपणे बोर्डानेही काही सांगितले नाही.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा