Headlines

क्रिस्टियानो रोनाल्डो मध्यरात्री अडकला विवाहबंधनात, पत्नी जॉर्जियाचा ग्लॅमरस अंदाज पाहून थक्क व्हाल – cristiano ronaldo wife georgina rodríguez look stunning in white dress


फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने दीर्घकाळाची प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत अखेर विवाह केला आहे. 11 ऑगस्ट 2026 रोजी पोर्तुगालमधील कॅस्काइस येथे खासगी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. दोघांनी लग्नाच्या अंगठ्यांचा फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या आयुष्यातील या खास नव्या अध्यायाची माहिती दिली.

Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez wedding photos
Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez wedding photos
फुटबॉलच्या मैदानावर आपल्या जबरदस्त कामगिरीने जगभरात वेगळी ओळख निर्माण करणारा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो अखेर आपल्या आयुष्यातील एका खास टप्प्यावर पोहोचला आहे. रोनाल्डोने त्याची दीर्घकाळाची साथीदार आणि मॉडेल जॉर्जिना रॉड्रिग्ज हिच्यासोबत विवाह केला आहे. जवळपास दशकभराच्या नात्यानंतर दोघांनी आपल्या नात्याला अधिकृत स्वरूप दिले आहे. 11 ऑगस्ट 2026 रोजी पोर्तुगालमधील कॅस्काइस येथे हा खासगी नागरी विवाहसोहळा पार पडला. रोनाल्डो आणि जॉर्जिना यांनी आपल्या लग्नाची माहिती अतिशय खासगी पद्धतीने चाहत्यांपर्यंत पोहोचवली. दोघांनी सोशल मीडियावर हातातील लग्नाच्या अंगठ्या दाखवणारा फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले. या बातमीनंतर जगभरातील चाहत्यांनी या स्टार कपलवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. (फोटो सौजन्य :- @georginagio)

1

1

हेअरस्टाईलने दिला पूर्ण लुक

हेअरस्टाईलने दिला पूर्ण लुक

जॉर्जिनाच्या या लूकमध्ये तिची हेअरस्टाईल देखील तितकीच लक्षवेधी ठरली आहे. तिने केस मागच्या बाजूला नीट सेट करत चेहऱ्याला उठाव देणारी साधी पण आकर्षक स्टाइल केली आहे. या हेअरस्टाईलमुळे तिचा चेहरा अधिक खुलून दिसतो आणि सनग्लासेससोबत तिच्या लूकला एक बोल्ड आणि एलिगंट अंदाज मिळतो. व्हाइट ड्रेसचा क्लासी लूक, काळ्या रंगाच्या अॅक्सेसरीज आणि नीट सेट केलेले केस यांचा सुंदर मेळ साधत जॉर्जिनाने संपूर्ण स्टाइलमध्ये ग्लॅमरची भर घातली आहे. विशेष म्हणजे, अतिशय साधी हेअरस्टाईल असूनही ती तिच्या संपूर्ण लूकला परफेक्ट फिनिश देते. त्यामुळे ड्रेसपासून हेअरस्टाईलपर्यंत प्रत्येक डिटेलने तिचा लूक आणखी आकर्षक केला आहे.

बॅगने पूर्ण केला लुक

बॅगने पूर्ण केला लुक

जॉर्जिनाच्या या स्टायलिश लूकमध्ये तिच्या ब्लॅक हँडबॅगने आणखी भर घातली आहे. छोट्या आकाराची काळ्या रंगाची बॅग तिने हातात कॅरी केली असून, तिच्या पांढऱ्या ड्रेससोबत तयार होणारा ब्लॅक-अँड-व्हाइट कॉन्ट्रास्ट विशेष आकर्षक दिसतो. ड्रेस, काळ्या रंगाच्या हिल्स, सनग्लासेस आणि हेअरस्टाईलसोबत ही बॅग तिच्या संपूर्ण लूकला परफेक्ट फिनिश देते. साधी पण क्लासी अॅक्सेसरी निवडून जॉर्जिनाने मिनिमल स्टाइलमध्येही ग्लॅमर कसं टिकवायचं, याची झलक दिली आहे. तिच्या या लूकमधील प्रत्येक छोटासा तपशील लक्ष वेधून घेताना दिसतो.

सिंपल मेकअपने पूर्ण केला ग्लॅमरस लूक

सिंपल मेकअपने पूर्ण केला ग्लॅमरस लूक

जॉर्जिनाने आपल्या या लूकसाठी सिंपल आणि एलिगंट मेकअपला पसंती दिल्याचे दिसते. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कायम ठेवत तिने हलका बेस, उठावदार डोळे आणि न्यूड टोनच्या लिपस्टिकचा वापर केला आहे. तिच्या चेहऱ्यावरील सौंदर्य अधिक खुलून दिसावे, यासाठी मेकअपमध्ये अतिशय कमी आणि संतुलित रंगांचा वापर करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, तिच्या पांढऱ्या ड्रेससोबत हा नैसर्गिक मेकअप लूक अगदी परफेक्ट जुळतो. हेअरस्टाईल, सनग्लासेस आणि ब्लॅक अॅक्सेसरीजसोबत साध्या मेकअपने तिच्या संपूर्ण लूकला एक क्लासी आणि ग्लॅमरस फिनिश दिली आहे.

प्रत्येक लुक युनिक

प्रत्येक लुक युनिक

जॉर्जिनाच्या प्रत्येक फोटोमध्ये तिच्या स्टाइलची वेगळी झलक पाहायला मिळते. कधी व्हाइट ड्रेसमधील तिचा एलिगंट अंदाज लक्ष वेधून घेतो, तर कधी सिंपल मेकअप आणि आकर्षक हेअरस्टाईल तिच्या सौंदर्यात भर घालतात. ब्लॅक बॅग आणि सनग्लासेससारख्या छोट्या अॅक्सेसरीजमुळे तिच्या प्रत्येक लूकला वेगळा टच मिळतो. त्यामुळे तिचा प्रत्येक फोटो एकाच स्टाइलची पुनरावृत्ती न करता युनिक, ग्लॅमरस आणि लक्षवेधी ठरतो.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा