Headlines

भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकले तर पॉइंट टेबलमध्ये भरारी नाहीच पण हरल्यावर मोठा फटका, कारण काय? जाणून घ्या


मुंबई : भारतास कसोटी जगज्जेतेपद क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी आगामी मोसम महत्त्वाचा आहे. श्रीलंकेतील मालिकेने त्यास सुरुवात होईल. भारत या क्रमवारीत सध्या पाचवा आहे. श्रीलंकेतील कसोटी जिंकल्या आणि अन्य निकालांची साथ लाभली नाही, तर भारताच्या क्रमवारीत बदल होणार नाही. केवळ भारत आणि आघाडीवरील संघातील फरक कमी होईल.

भारतीय संघ सध्या ४८.१५ टक्के गुणांसह पाचवा आहे. ऑस्ट्रेलिया (८७.५०), दक्षिण आफ्रिका (७५), न्यूझीलंड (७२.२२) आणि बांगलादेश (५८.३३) यांनी भारतास मागे टाकले आहे. श्रीलंका ४१.६७ टक्के गुणांसह सहावे आहेत. भारतास त्यांच्या विजयापेक्षा ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशविरुद्धचा विजय जास्त फायदेशीर ठरेल. भारताने दोन्ही कसोटी जिंकल्या, तर भारताचे ५७.५८ टक्के गुण होतील. या परिस्थितीतही भारत पाचव्याच क्रमांकावर कायम राहील. हे गुण बांगलादेशला मागे टाकण्यासाठी पुरेसे नाहीत. अर्थात, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिका त्याच सुमारास आहे. ऑस्ट्रेलियाचे यश भारताच्या पथ्यावर पडेल. भारताने दोन्ही कसोटी जिंकल्या; तसेच बांगलादेश ऑस्ट्रेलियात विजयाविना राहिले, तरी भारत पाचव्या क्रमांकावर जाणार आहे.

Maharashtra TimesSourav Ganguly : सौरव गांगुली आणि पत्नी डोना यांना जीवे मारण्याची धमकी, महिनाभरापासून सुरु होता गंभीर प्रकार; पोलिसांत तक्रार दाखलश्रीलंकेने भारताविरुद्धची मालिका १-० जिंकली आणि बांगलादेश ०-२ पराभूत झाल्यास भारत ४२.४२ टक्के गुणांसह पाचवा राहील. मात्र, या परिस्थितीत श्रीलंकेने भारतास मागे टाकले असेल, श्रीलंकेने धवल यश मिळवले आणि बांगलादेशने एक कसोटी अनिर्णित राखली, तर भारत ३९.३९ टक्के गुणांसह सहाव्या क्रमांकावर घसरण्याचा धोका आहे.

Maharashtra TimesWest Indies Cricket : दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज अडचणीत, 2027 वनडे वर्ल्डकपमधील पात्रतेचा मार्ग कठीण! कारण काय?‘श्रीलंका क्रिकेट’ संघाविरुद्धच्या सराव सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव गोलंदाजीस आला नाही. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत शंका घेतली जात आहे. मात्र, त्याला विश्रांती देण्यात आली होती, असे भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी स्पष्ट करून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. भारत-श्रीलंकेदरम्यानची पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

भारताने सराव सामना जिंकल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत बहुतुले म्हणाले, ‘कुलदीपच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही प्रश्न नाही. त्याने पहिल्या डावात १८ षटके मारा केला होता; तसेच सामन्यापूर्वी तीन षटके गोलंदाजी केली होती. दुसऱ्या डावाच्या वेळी त्याला विश्रांती देण्यात आली होती.’ या सामन्यातील दुसऱ्या डावात रवींद्र जाडेजा, मानव सुतार आणि सारांश जैनला जास्त मारा करावा लागला. पहिल्या कसोटीतील पर्याय जाणून घेण्यासाठीच हा निर्णय झाला होता, असे सांगितले जात आहे.

Maharashtra TimesIrfan Pathan : ‘तुझ्या आई-बापाने हेच शिकवलंय का?’; संगकारा इरफान पठाणवर का भडकला? 21 वर्षांनी वादाचं कारण समोर
सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीने फलंदाजांना साथ दिली होती. त्यानंतर फिरकी गोलंदाजांना त्याचा फायदा झाला होता. ‘मानव आणि जाडेजाने १४-१५ षटके मारा केला होता. त्यांना खेळपट्टीचे नेमके रंग जाणून घेण्यास त्यामुळे मदत झाली. त्यांची पहिल्या कसोटीसाठी चांगली पूर्वतयारी झाली आहे,’ असे बहुतुले यांनी सांगितले. सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनी कसब दाखवले

Maharashtra TimesAjinkya Rahane : काय रे! निवृत्तीनंतर मला पहिला फोन सचिन पाजीचा आलेला, एकच गोष्ट बोलले; अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासातिसऱ्या दिवशी फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर त्यांनी चेंडूवर चांगले नियंत्रण राखले, याकडे लक्ष वेधण्यात आले. ‘जाडेजा यापूर्वी श्रीलंकेत खेळला आहे. त्यामुळे त्याला येथे मारा कसा करावा याचा अनुभव आहे. मानव सुत्तार आणि सारांश जैनसारख्या नवोदित गोलंदाजांना येथील खेळपट्टी; तसेच वातावरणाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. चेंडूचा नेमका टप्पा आणि दिशा कशी असावी, आपण मारा करीत असताना क्षेत्ररचना कशी असावी, हेही त्यांनी जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे,’ असे बहुतुले म्हणाले.

फिरकीच केंद्रस्थानी

मालिकेच्या पूर्वतयारीत फिरकीचा सामना करणे केंद्रस्थानी

  • गिलचे त्यास प्राधान्य, त्याचा सामना करण्यासाठी आग्रह
  • तळाच्या फलंदाजांकडून अधिकाधिक सराव करून घेण्याचे संघव्यवस्थापनाचे लक्ष्य
  • गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर प्रत्येक धाव मोलाची, या परिस्थितीत तळाच्या फलंदाजांकडून कामगिरीची अपेक्षा
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत