Jalna Crime News : पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार आरोपीने विक्रीसाठी ह्या तलवारी आणल्या होत्या. मात्र, पोलीस आरोपीच्या इतर उद्देशांची देखील तपासणी करत आहेत.
जालना पोलीस धारदार शस्त्रे जप्त(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : जालना शहरात धारदार शस्त्रांचा मोठा साठा आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चंदनझिरा पोलिसांनी सुंदरनगर परिसरात धडक कारवाई करत तब्बल 41 धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. यामध्ये 22 तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपरचा समावेश असून, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे 1 लाख 34 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी शेख माजेद नामक संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांच्या हाती काय काय लागलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील सुंदरनगर परिसरात मोठ्या प्रमाणातधारदार शस्त्रांचा साठा आणण्यात आल्याची माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना गुप्तपद्धतीने मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती 22 तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपर अशी एकूण 41 घातक धारदार शस्त्रे लागली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही शस्त्रे जालना, भोकरदन आणि परतूर शहरातील विविध भागांमध्ये विक्री करण्याच्या उद्देशानं आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शस्त्रसाठ्यामागे नेमका कोणाचा हात आहे? तसेच या शस्त्रांची विक्री कोणाला करण्यात येणार होती? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, या शस्त्रांची मागणी राजस्थानमधील अजमेरयेथून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे जालना शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे नेमकी कशासाठी आणण्यात आली होती? याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.
या प्रकरणात शस्त्रांची खरेदी करणारे, त्यांची वाहतूक करणारे आणि जालना जिल्ह्यात त्यांची विक्री करणारे व्यक्ती कोण आहेत? याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का? याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. दरम्यान, जालना शहरात मोठ्या प्रमाणात तलवारी आणि इतर धारदार शस्त्रे आढळून आल्यानं नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शस्त्रसाठ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या कारवाईबाबत जालना डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली असून, ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी सुरू आहे. या शस्त्रसाठ्यामागे आणखी कोण कोण सहभागी आहेत? आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता? हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा