![]()
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा झालेला पराभव आणित्यानंतर अनेक पक्षांत झालेली पक्षांतरे यामुळे प्रादेशिकपक्षांच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.सध्या प्रादेशिक पक्ष संकटाचा सामना करत आहेत हेखरे आहे. परंतु त्यांचे महत्त्व संपले असे मानणे घाईचेठरेल. बंगालमध्ये तृणमूल किंवा दिल्लीत‘आप”सारख्या पक्षांच्या पराभवाकडे प्रादेशिक पक्षांचाकायमचा अस्त म्हणून पाहिले जाऊ नये. गेल्या चारलोकसभा निवडणुकांसोबतच विविध राज्यांच्याविधानसभा निवडणुकांतही राष्ट्रीय आणि प्रादेशिकपक्षांच्या मतांच्या टक्क्यांत फारसा फरक पडला नाही. कोणत्याही पक्षाचा मूळ जनाधार ओळखण्यासाठीमतांची टक्केवारी हा सर्वात उत्तम निकष असतो. हेलक्षात घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय,लोकसभेच्यातुलनेत मतदार विधानसभा निवडणुकांत प्रादेशिकपक्षांना अधिक पसंती देतात. ही बाब स्थानिक राजकीय ओळखीचे महत्त्व अधोरेखित करते. बंगालमधील पराभवानंतर तृणमूलच्या अनेक आमदार,खासदारांना पक्षांतराला सामोरे जावे लागले. ‘आप”च्याराज्यसभा खासदारांमध्येही मोठ्या प्रमाणावर पक्षांतरझाले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्रपवार) खासदारांनीही गट बदलला. या घडामोडीसंघटनात्मक कमकुवतपणा नक्कीच दाखवतात. पण हाजनसमर्थन घटल्याचा पुरावा मानला जाऊ शकत नाही.सध्या 11 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तरकाँग्रेसची सत्ता 3 राज्यांत आहे. प्रादेशिक पक्ष 4राज्यांमध्ये सत्ता चालवत आहेत. 10 इतर राज्ये आणिकेंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालीलआघाडी सरकारे सत्तेत आहेत. यातील 4 राज्यांतप्रादेशिक पक्ष आघाडीचे प्रमुख भागीदार आहेत आणिभाजपची भूमिका घटक पक्षाची आहे. आंध्र प्रदेश,मेघालय, नागालँड व पुद्दुचेरी ही ती राज्ये आहेत. उर्वरित6 राज्यांत भाजप प्रादेशिक पक्षांशी युती करून सरकारचेनेतृत्व करत आहे. यात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम,गोवा, महाराष्ट्र आणि त्रिपुराचा समावेश आहे. 3राज्यांमध्ये काँग्रेसही प्रादेशिक पक्षांसोबत आघाडीसरकारचा भाग आहे. झारखंडमध्ये काँग्रेस ही‘झामुमो”ची तर जम्मू-काश्मीरमध्ये ‘नॅशनलकॉन्फरन्स”ची लहान सहकारी पक्ष आहे. केरळमध्येकाँग्रेस इतर प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी सरकारचेनेतृत्व करत आहे. गेल्या चार लोकसभानिवडणुकांमधील विविध पक्षांच्या मतांचे विश्लेषणकेले असता या काळात राष्ट्रीय पक्षांची एकूण मते60.04% ते 68.15% दरम्यान राहिल्याचे दिसते.म्हणजेच त्यांचे एकूण राजकीय समर्थन साधारण स्थिरराहिले आहे. सर्वाधिक 68.15% मते त्यांना 2019 च्यालोकसभा निवडणुकीत मिळाली होती. महत्त्वाची बाबम्हणजे 2014 ची निवडणूक हे दाखवते की भारताच्या‘फर्स्ट-पास्ट-द-पोस्ट ” निवडणूक पद्धतीत मतांचीटक्केवारी, निवडणुकीचा निकाल नेहमी एकमेकांनुसारनसतो. गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये 2014मध्ये राष्ट्रीय पक्षांची एकूण मते सर्वात कमी असूनही,भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए”ने स्पष्ट बहुमतमिळवून केंद्रात सरकार स्थापन केले होते. 2009 च्यालोकसभा निवडणुकीत सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळून63.59% मते मिळाली होती तर 2024 च्या निवडणुकीतहा आकडा 62.72% होता. दुसरीकडे, प्रादेशिक पक्षांनी लोकसभा निवडणुकांमध्येसातत्याने सुमारे एक-तृतीयांश मते मिळवली. 2009 च्यालोकसभा निवडणुकीत सर्व प्रादेशिक पक्षांना मिळून31.22% मते मिळाली होती, तर 2014 मध्ये हे प्रमाण35.86% होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतहीसर्व प्रादेशिक पक्षांची एकूण मते 33.52% होती. केवळ2019 ची निवडणूक याला अपवाद ठरली. तेव्हाप्रादेशिक पक्षांची मते 28.1% पर्यंत खाली आली होती. हेआकडे स्पष्ट करते की काही राज्यांत पराभव होऊनहीप्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर व अनेक राज्यांतआपला जनाधार मजबूत ठेवला आहे. परंतु,तमिळनाडूमध्ये ‘द्रमुक”चे नुकसान झाले तेव्हा त्यांचीजागा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने नाही, तर ‘टीव्हीके” यादुसऱ्या प्रादेशिक पक्षाने घेतली हे आपण विसरता कामानये. यावरून अनेक राज्यांतील राजकीय स्पर्धेचे स्वरूपअजूनही प्रामुख्याने प्रादेशिक ताकदींवरच अवलंबूनअसल्याचे दिसून येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) गेल्या चार लोकसभानिवडणुकांसोबतच विविध राज्यांच्याविधानसभा निवडणुकांमध्येही प्रादेशिकपक्षांच्या मतांच्या टक्क्यांमध्ये फारसाबदल झालेला नाही. मतांची टक्केवारीहा पक्षाचा मूळ जनाधार दर्शवणारा उत्तमनिकष असतो.
Source link
संजय कुमार यांचा कॉलम:राज्यांमधील प्रादेशिक पक्षांनी आपला जनाधार कायम ठेवला
