Headlines

Gold- Silver Price Today 10 August 2026; ऑगस्टच्या दुसऱ्या सोमवारी गुंतवणूकदारांना सुगीचे दिवस; सोन्याचा भाव दीड लाखांच्या पार, चांदीची जोरदार मुसंडी


Today’s Gold and Silver Rate 10 August 2026: गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या किमतीत जबरदस्त तेजी पाहायला मिळाली, पण ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सराफा बाजारावर काहीसा दबाव दिसत आहे. एकीकडे सोन्याच्या दरांत किंचित घट होत असून चांदीच्या किंमती वाढीसह व्यवहार करत आहेत. त्यामुळे आज 10 ग्रॅम सोन्यासाठी आणि एक किलो चांदीसाठी किती किंमत मोजावी लागणार, चला जाणून घेऊया.

Gold silver price today 10 August 2026 on MCX
सोने-चांदीचा आजचा दर काय(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Gold Price News : गेल्या आठवड्याभरातील दमदार तेजीनंतर 10 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या नवीन आठवड्याच्या पहिल्याच व्यापार दिवशी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. मागील काही दिवसांपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू असताना अलीकडच्या हालचालींनंतर सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, MCX वर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये किंचित वाढ दिसून आली तर, अमेरिकी शेअर बाजारातील फ्युचर्समध्ये संमिश्र कल दिसत आहे.

सोने-चांदीच्या दरांत तेजीचा ट्रेंड

आर्थिक आणि बाजार घटकांच्या एकत्रित परिणामामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पिवळसर धातूचे आकर्षण वाढीच्या पार्श्वभूमीवर 10 ऑगस्ट रोजी सुरुवातीच्या व्यवहारात बुलियनच्या किमतीत किंचित वाढ झाली. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता MCX वर सोन्याचा वायदा 1.51 लाख रुपयांवर सपाट व्यवहार करत होता, तर चांदीचे फ्युचर्स 1700 रुपये किंवा 0.76 टक्के वाढीसह 2,33,260 रुपयांवर पोहोचले आहेत. अशाप्रकारे, देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,52,340 रुपये, तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 1,39,640 रुपये आणि 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,14,250 रुपये झाला आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत बाजारात चेन्नईमध्ये सोने आणि चांदीचे सर्वाधिक दर, तर दिल्लीमध्ये सर्वात कमी दर नोंदवले गेले.

Maharashtra TimesGold Exchange: 32 ग्रॅम सोने अन् 35000 रुपये; जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन अंगठी बनवायचं आश्वासन देऊन ग्राहकाची फसवणूक, आता न्यायालयाने दिले आदेश

सोन्याच्या दरवाढीचे कारण काय?

मागील काही दिवसांतील सराफा बाजारातील तेजीला अमेरिकन डॉलरमधील घसरण आणि अमेरिका-इराण यांच्यातील संभाव्य अणुकराराबाबत वाढलेला आशावाद या घडामोडी कारणीभूत ठरले आहेत. मात्र, अद्यापही भू-राजकीय अनिश्चितता कायम असतानाही बाजारातील वातावरण सकारात्मक राहिले पुढील 48 तासांत वाटाघाटींबाबत एखादा महत्त्वाचा निर्णय किंवा निष्कर्ष समोर येऊ शकतो, असे संकेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिल्यानंतर बाजाराला पुढील काही दिवसांत किमती उच्च राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesFPI In Share Market : परदेशी गुतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावर विश्वास कमी होतोय, 14 वर्षांचा गाठला नीचांक; याचा अर्थ काय?
याशिवाय बाजारातील गुंतवणूकदार आता या आठवड्यात शुक्रवारी जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या नॉन-फार्म पेरोल्स आणि बेरोजगारीविषयक आकडेवारीवरही बारकाईने लक्ष ठेवून असतील. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबत धोरणाविषयी अपेक्षा निश्चित करण्यात या आकडेवारीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.