Headlines

Income Tax Returns Types Belated Revised And Updated ITR ; ITR Return दाखल करण्याचे विविध प्रकार, ‘जर वाढवण्यात आलेली मुदतही चुकली तर?’ जाणून घ्या मार्ग


यंदाच्या वर्षी ITR Return करण्यासाठी 31 जुलै 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली होती. तारीख चुकली म्हणून टेन्शन घेण्याची मुळीच गरज नाही. जर तुम्ही 31 जुलै ही तारीख चुकवली असेल तर अजूनही सर्व दरवाजे बंद झाले नाहीत. अगदी पुढील 4 वर्षांपर्यंत तुम्हाला तुमचा कर भरता येऊ शकतो, पण जितका वेळ जाईल तितका तुमच्या खिशावर भार वाढेल. जाणून घ्या ITR Return करण्याचे विविध प्रकार.

Income Tax Returns Types
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सध्या नोकरदार वर्गामध्ये विविध प्रश्न आहेत. करदात्यांना आयकर विभागाच्या वेगवेगळ्या नियमांविषयी बहुदा गोंधळही असतो. जर तुम्हालाही Income Tax Return च्या विविध प्रकारांविषयी मनात अनेक प्रश्न आहेत तर निश्चिन्त रहा. आता तुमचा सगळा गोंधळ दूर होणार आहे. ITR चे काही प्रकार पुढीलप्रमाणे : बिलेटेड आयटीआर , रिवाइज आयटीआर तसेच अपडेटेड आयटीआर .

Belated ITR

असेसमेंट इअर 2025-26 मध्ये करदात्यांना कर भरण्यासाठी 31 जुलै 2026 तारखेची मुदत देण्यात आली होती. ज्या करदात्यांना काही कारणामुळे कर भरण्याच्या अधिकृत मुदतीअगोदर कर्ज भरता येत नाही किंवा लक्षात न राहिल्यामुळे मुदतीची तारीख चुकते, त्या करदात्यांना बिलेटेड ITR फाईल करावा लागतो. असेसमेंट इअर 2025-26 मध्ये बिलेटेड ITR फाईल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2026 देण्यात आली आहे. Belated ITR फाईल करताना करदात्याला लेट फी लागू होते. 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्याला अतिरिक्त 1000 रुपये विलंब शुल्क म्हणून भरावा लागू शकतो तर 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्याला अतिरिक्त 5000 रुपये विलंब शुल्क म्हणून भरावे लागते.

Revised ITR

यंदाची कर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. रिवाइज ITR मध्ये करदात्याला चूक सुधारण्याची संधी मिळते. या चुका म्हणजे बँक इंटरेस्ट राहिला, करदात्याकडून TDS चुकीचा भरला गेला, दाखवण्यात आलेली इन्कम किंवा डिडक्शन चुकीची दाखवण्यात आली किंवा पुरवण्यात आलेला तपशील चुकीचा आहे. जर करदात्याने मुदत संपण्यागोदर कर भरला असेल पण नंतर त्याच्या लक्षात आले की ‘काही तरी चुकतंय?’, तेव्हा ती चूक सुधारण्यासाठी Revised ITR फाईल केला जातो. अगदी मुदतीनंतरही रिवाइज ITR फाईल केला तरी त्यावर कोणताही विलंब शुल्क आकारला जात नाही.

Maharashtra TimesFPI In Share Market : परदेशी गुतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावर विश्वास कमी होतोय, 14 वर्षांचा गाठला नीचांक; याचा अर्थ काय? Updated ITR

जेव्हा करदात्याला लक्षात येतं की आता Belated ITR फाईल करण्याची मुदतही संपली आहे तेव्हा पात्र असल्यास करदात्याला अपडेटेड ITR ( ITR – U ) लागू होतो. लक्षात घेण्याची महत्वाची बाब म्हणजे अपडेटेड ITR फाईल करण्याची वेळ 48 महिन्यांची असते आणि जितका विलंब कराल तितका विलंब शुल्क वाढत जातो. अपडेटेड ITR साठी अर्ज करण्याच्या पहिल्या 12 महिन्यात 25% ऍडिशनल टॅक्स भरावा लागतो. जर 12 ते 24 महिन्यांच्या कालावधीतही करदात्याने ITR भरले नाही तर 50% ऍडिशनल टॅक्स भरावा लागतो. 24 ते 36 महिन्यांच्या विलंबासाठी 60% ऍडिशनल टॅक्स तर 36 ते 48 महिन्यांच्या विलंबासाठी 70% ऍडिशनल टॅक्स भरवा लागतो.

Belated ITR तसेच Revised ITR मध्ये पात्र असणाऱ्या करदात्यांना रिफंड मिळतो. तर रिफंड क्लेम करण्यासाठी अपडेटेड ITR वापरता येत नाही.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा