Headlines

Lucky Ali : ‘जिथे माझा जीव जाईल तिथेच मला दफन करा, मी माझी शवपेटी घेऊन फिरतो’, सुप्रसिद्ध गायकाचं डोळे पाणावणारं वक्तव्य


Lucky Ali : सुप्रसिद्ध गायक लकी अली यांनी त्यांच्या कॉन्सर्टदरम्यान मृत्यूबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

singer lucky ali On His Death
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेते मेहमूद अली यांचा मुलगा गायक, गीतकार आणि अभिनेते लकी अली त्यांच्या एका कॉन्सर्टदरम्यान भावूक झाले. त्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल आणि अंत्यसंस्कारांबद्दल भाष्य केलं. ९० च्या दशकात वाढलेल्या संपूर्ण पिढीला आपल्या गाण्यांनी वेड लावणारे लकी अली सध्या चर्चेत आले आहेत.

६७ वर्षीय लकी अली यांनी कॉन्सर्टदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधला आणि जीवन व मृत्यूच्या सत्यावर आपले विचार व्यक्त केले. लकी अली यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लकी अली यांनी स्वतः हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Maharashtra TimesHrishikesh Joshi : ‘ब्रह्मांड आठवलं, प्लॅटफॉर्म दिसताच उडी मारली’, मुंबईत पहिलाच दिवस, हृषिकेश जोशींनी सांगितला लोकलनं प्रवास करण्याचा अनुभव

लकी अली म्हणाले, ‘एक दिवस मला जायलाच हवं.’

प्रेक्षकांशी बोलताना लकी अली म्हणाले की, ते त्यांच्या चाहत्यांवर खूप प्रेम करतात, पण त्यांना हेही माहीत आहे की प्रत्येकाला एक दिवस हे जग सोडावंच लागतं. लकी अली म्हणाले, ‘मला माहित आहे की, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण एक दिवस मला जायलाच हवं. मी तुम्हाला यासाठी तयार करत नाहीये, पण मी खरोखरच मृत्यूसाठी तयार आहे.’

Maharashtra TimesSai Tamhankar : ‘त्यानं माझ्या कंबरेला पकडलं’, बसमध्ये मुलानं काढली छेड, सई ताम्हणकरनं चांगलीच घडवली अद्दल; अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग
त्यानंतर लकी अली यांनी सांगितलं की, जेव्हा जेव्हा ते प्रवास करतात, तेव्हा ते त्यांची शवपेटीसोबत घेऊन जातात. लकी अली म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा मी प्रवास करतो, तेव्हा मी माझी शवपेटीसोबत घेऊन प्रवास करतो. मी जिथे मरेन, तिथेच मला दफन करा.’ लकी अली यांचं हे वक्तव्य ऐकून तिथे उपस्थित असलेले चाहतेही भावूक झाले. लकी अली यांचा चाहता म्हणाला की, ‘आता ३० वर्षे झाली आहेत, आणि माझा लकी अली यांच्यावरचा विश्वास कधीच डगमगला नाही.’

Maharashtra TimesDharmendra :विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात, दोन लग्न होऊनही लोकप्रिय अभिनेत्रीसोबत अफेअर; धर्मेंद्र यांचं वैयक्तिक आयुष्य होतं चर्चेत
लकी अली यांनी अनेक गाजलेली गाणी गायली आहेत. लकी अली यांच्या प्रसिद्ध गाण्यांबद्दल बोलायचं झाल्यास, ‘ओ सनम’ व्यतिरिक्त ‘गोरी तेरी आँखे कहे’ आणि ‘तेरी याद जब आती है’ यांसारखी गाणीही खूप लोकप्रिय झाली आहेत. लकी अली यांनी बॉलिवूडसाठी ‘ना तुम जानो ना हम’, ‘हैरत’, ‘एक पल का जीना’, ‘आहिस्ता आहिस्ता’ आणि ‘सफरनामा’ यांसारखी अनेक अविस्मरणीय गाणी गायली आहेत.