V.V.S. Laxman On Team India Coach : भारतीय संघाच्या कोचपदी राहुल द्रविड यांच्यानंतर लक्ष्मण यांची निवड जवळपास फिक्सच होती. जय शाह यांचे बोलणेही झाले होते, मात्र पुढे नेमकं काय झालं? गंभीरकडे कोचपदाची सूत्रे गेलीत याबाबत स्वत: लक्ष्मण याने खुलासा केला आहे.
VVX Laxman Jay Shah Gautam Gambhir(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि NCA चे प्रमुख असलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी एक मोठा खुलासा केला आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असलेल्या राहुल द्रविड यांच्यानंतर ही ऑफर लक्ष्मण यांना आली होती. आताचे आयसीसीचे अध्यक्ष आणि तत्कालीन बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी द्रविडनंतर ही जबाबदारी लक्ष्मणकडे देण्याचा विचार केला होता. पण नेमकं काय झालं? राहुल द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीर यांची वर्णी कशी काय लागली? यासंदर्भात लक्ष्मणने सविस्तर सांगितलं आहे.
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण काय म्हणाला?
मी २०२३ मध्येच भारतीय संघाचा कोच झालो असतो. पण माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे ते होऊ शकले नाही. त्यावेळी जय शाह यांच्याशी माझं दोनवेळा बोलणं झालेलं, त्यांनी माझी अडचण समजून घेतली होती. बीसीसीआयने मला माझ्या पद्धतीन काम करण्याची मोकळीक दिल्याचं लक्ष्मण यांनी सांगितलं. भारताच्या पुरुष आणि महिला संघांचे व्यवस्थापन, ‘एसएसएम’ म्हणजेच क्रीडा विज्ञान (स्पोर्ट्स सायन्स) आणि वैद्यकीय कर्मचारी. तसेच निवड समित्या यांच्याशी सीओईचा उत्तम समन्वय आहे, असेही लक्ष्मण म्हणाले. निवड समितीचे अध्यक्ष सीओईशी संपर्क साधून संबंधित खेळाडूंचा फिटनेस अहवाल मागवतात. आम्ही खेळाडूंची सद्यस्थिती त्यांना पाठवतो. त्या अहवालाची एक प्रत संबंधित मुख्य प्रशिक्षक आणि बीसीसीआयलाही दिली जाते. ही ठरलेली प्रक्रिया असल्याचं लक्ष्मण यांनी स्पष्ट केलं.
संघ रवाना होण्यापूर्वी २१ किंवा २८ दिवस आधी संघनिवड केली जाते. एखादा खेळाडू उपचार घेत असेल, तर तो पूर्ण फिट झाल्यानंतरच संघात सहभागी होईल, असे स्पष्ट केले जाते. फिट झाल्याशिवाय खेळाडूला मुक्त केले जात नाही. त्याचे फिटनेसचे निकष ठरलेले असतात, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले.
IND vs SL : पडिक्कलने शतक ठोकलं, गोलंदाजांनी कंबरडं मोडलं; सराव सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारताचा 6 विकेट्सने विजय वनडे वर्ल्ड कप २०२३ चे आयोजन भारताकडे होते. फायनल सामन्यामध्ये कांगारूंनी भारताला पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ हा संपत होता. मात्र काही खेळाडूंच्या मागणीनंतर त्यांचा कार्यकाल एक वर्षाने म्हणजेच २०२४ पर्यंत वाढवण्यात आलेला. भारताने टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर द्रविड यांचा कार्यकाल संपला. या वर्ल्डकपनंतरच भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाले होते.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा