रत्नागिरीत आता समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 धोरण रोबवलं जाणार आहे. यानुसार प्लास्टीकवर पूर्णपणे बंदी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळी संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्यासाठीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या सगळ्यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. तसेच 15 ऑगस्टला होणाऱ्या विशेष ग्रामसभेत याबाबतची माहिती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या जाणार आहेत, जेणेकरून स्वच्छता, प्लास्टिक बंदी याची जनजागृती ग्रामीण पातळीवर प्रभावीपणे केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्याकरिता घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 च्या अंमलबजावणीबाबत स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षाची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधकारी परिक्षित यादव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संदीप टोपे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, उप परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते.
कोकोणत्या ठिकाणी प्लास्टीक बंदी केली जाणार?
सर्वप्रथम पर्यावरण संवेदनशील ठिकाणे, सह्याद्री पश्चिम घाट, बीचेस, प्रमुख पर्यटन स्थळे या ठिकाणी संपूर्णपणे प्लास्टीक बंदी नियमावली केली जाणार आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी संदीप टोपे यांनी याविषय वाचन करुन घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची कर्तव्ये याविषयी माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची कर्तव्ये या विषयी माहिती दिली.
जिल्हाधिकारी काय म्हणाले?
जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले की, टप्प्या-टप्प्याने प्लास्टीक बंदी करण्याबाबत सर्व यंत्रणांनी अंमलबजावणीबाबत नियोजन करावे. प्राधान्याने ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते, महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवरती समुद्रकिनाऱ्यावरती तसेच पर्यावरण संवेदनशील ठिकाणे, सह्याद्री पश्चिम घाट परिसर यांचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी कचरा कुंड्या, वेंडीग मशीन्स, आरओ यंत्रणा, वॉटर एटीएम यांची सुविधासर्व प्रथम करावी. यासाठी आढावा तयार करून जिल्ह्यातील सामाजिक संघटनांचाही सहभाग घेतला जाणार आहे. प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी काय-काय सूचना दिल्या?
जिल्हा परिषद आणि नगरपरिषदा यांनी घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबत धोरण, रणनिती ठरवावी. त्यासंदर्भातला घनकचरा संकलन, वाहतूक आराखडा पुढील 5 वर्षासाठी घनकचरा निर्मितीचा अंदाज, कचरा पेट्या ठेवण्याचे वेळापत्रक, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रक्रिया याबाबतचा आराखडा तयार करावा. कचऱ्याचे वर्गीकरण (फोर वे सेग्रीगेशन) व्हायला हवे तसा आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच 15 ऑगस्टला होणाऱ्या विशेष ग्रामसभेत याबाबतची माहिती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागात कुक्कुटपालन, गोठे असणाऱ्या ठिकाणी गोबर गॅस निर्मितीवर भर देण्यात यावा, असा आदेश देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाचं मोलाचं आवाहन
पर्यटक, नागरिक, विक्रेते यांच्यामध्ये सर्वप्रथम जनजागृती करण्यावर भर ठेवा. यानंतरही कोणी नियम मोडल्यास जादा दंडाची आकारणी करुन पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी प्लास्टीक बंदीची अंमलबजावणी करता सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
गर्दीच्या पर्यटनस्थळांवर गर्दी कडक केले जाणार
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि गर्दी असणाऱ्या पर्यटनस्थळांवर स्वच्छतेचे प्लास्टिक बंदीचे निकष निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत. आता या सगळ्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशाप्रकारे केली जाते हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा