Headlines

Manoj Muntashir : ‘समाजात फूट पाडणारा सिनेमा’, ‘छावा’ सिनेमाला प्रोपगंडा म्हणालेले एआर रहमान; सुप्रसिद्ध लेखकाचं गायकाला सडेतोड उत्तर, काय म्हणाले?


Manoj Muntashir On AR Rahman : सुप्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एआर रहमान यांच्या ‘छावा’ सिनेमाबद्दलच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

Manoj Muntashir On AR Rahman
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – गायक आणि लेखक मनोज मुंतशीर यांनी अलीकडेच एआर रहमान यांच्या ‘छावा’ सिनेमाबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, मनोज यांनी सांगितलं की, एआर रहमान यांना बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झालंय. मनोज यांनी एआर रहमान यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, कदाचित इंडस्ट्रीतील लोकांशी चांगले संबंध नसल्यामुळे त्यांना काम मिळत नसेल.

एआर रहमानबद्दल काय म्हणाले मनोज?

एका मुलाखतीत मनोज मुंतशीर म्हणाले की, ‘जेव्हा मोहम्मद अझरुद्दीन भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार झाले, जेव्हा एक मुस्लिम व्यक्ती देशाचे राष्ट्रपती बनले, जेव्हा एआर. रहमान यांच्यासारखी एक महान व्यक्ती, ज्यांची आपली धार्मिक ओळख असूनही या देशात त्यांच्यापेक्षा मोठं नाव नाही, तेव्हा त्यांनी ‘मीच का?’ किंवा ‘मुस्लिमच का?’ असं का विचारलं नाही? आज जर तुम्हाला काम मिळत नसेल तर त्यामागचं दुसरं कारण शोधायला पाहिजे.

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

‘तुमचे बॉलिवूडमध्ये चांगले संबंध नाहीत, किंवा तुमची गाणी तितकी लोकप्रिय नाहीत. अनेक कारणं असू शकतात. जेव्हा कधी मी त्यांना भेटेन, तेव्हा मी त्याला ते नक्कीच विचारेन. तो खूप छान बोलतो. मला एआर. रहमान यांना भेटून विचारायला आवडेल. मी त्यांच्यासोबत ‘मैदन’ नावाचा एक चित्रपट केला होता. त्यातील सर्व गाणी अप्रतिम होती. त्यांच्यासोबतचा माझा अनुभव खूप छान होता.’

Maharashtra TimesAjit Vachani : अभिनेत्यानं बॉलिवूड गाजवलं, शाहीर साबळेंच्या लेकीसोबत लग्न; वयाच्या 52व्या वर्षी निधन, मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री
विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणाऱ्या एआर रहमान यांच्या वक्तव्यावर मनोज मुंतशीर यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज म्हणाले, ‘त्या सिनेमासाठी होकार द्यायचा नव्हता. असं नाही की चित्रपट बनवण्यापूर्वी तुम्हाला पटकथा ऐकवली नव्हती. तुम्ही अचानक संगीत द्यायला सुरुवात केली. तुम्ही पटकथा वाचली असेलच, बरोबर? त्यामुळे, जर तो एक प्रोपगेंडा होता, तर तुम्ही तो सिनेमा करायला नको होता. चित्रपट बनवल्यानंतर त्याला प्रोपगंडा म्हणण्याचं कारण मला समजत नाही.’ शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज मुंतशीर बोलत होते.

Maharashtra TimesLucky Ali : ‘जिथे माझा जीव जाईल तिथेच मला दफन करा, मी माझी शवपेटी घेऊन फिरतो’, सुप्रसिद्ध गायकाचं डोळे पाणावणारं वक्तव्य

‘छावा’बद्दल एआर रहमान काय म्हणाले?

बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत एआर रहमान ‘छावा’ सिनेमाबद्दल म्हणाले की, ‘हा चित्रपट समाजाला विभागणारा म्हणजेच समाजात फूट पाडणारा आहे. मला वाटतं की, या चित्रपटानं त्याचाचा फायदा उठवला. परंतु, या चित्रपटाचा मूळ उद्देश शौर्य दाखवणं हा होता. मी स्वतः दिग्दर्शकाला विचारलं होतं की, या चित्रपटासाठी तुम्हाला माझी गरज का आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की फक्त तुम्हीच हे करू शकता. चित्रपटांमुळं लोक प्रभावित होतात का? लोकांकडं स्वतःची सदसद्विवेकबुद्धी असते, त्यांना सत्य आणि अजेंडा यातील फरक समजतो.’