Headlines

Flat Possession Compensation RERA Rule; मुंबईकर कुटुंबाला फ्लॅटचे पझेशन मिळायला 2 वर्षे विलंब, नुकसान भरपाई नाकारली; घर घेणाऱ्याला माहिती हवा नियम

Real Estate Property Buying Mistakes: रिअल इस्टेटच्या मालमत्ता खरेदीतील बऱ्याच प्रकरणांत लोकांना फ्लॅटचा ताबा मिळायला वेळ लागतो, पण या काळातही ग्राहक कर्जाचे हप्ते भरणे सुरूच ठेवतात. अशी परिस्थती, तुमच्या किंवा जवळच्या नातेवाईक किंवा घरातील सदस्यांसोबत झालं तर ती व्यक्ती तक्रार दाखल करून नुकसान भरपाई मागू शकते, पण काही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

Real Estate Late Property Possession Compensation Claim
घर, फ्लॅट किंवा अपार्टमेंटचे उशीरा पजेशन मिळालं तर, तुम्ही नुकसान भरपाईची मागणी करू शकता
Property Rules: शहरात नोकरीसाठी स्थायिक होणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःच घर असावं पण, आजच्या काळात छोट्या-मोठ्या शहरांमध्ये घर खरेदी मोठं आव्हान बनलं आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात मालमत्तेचा व्यवहार करताना कधीकधी लोकांकडून काही चुका होतात आणि त्यांच्या कष्टाची कमाई बुडते. यापैकी बहुतेक प्रकरणांमध्ये लोकांना घर, फ्लॅट किंवा अपार्टमेंटचा ताबा मिळ्ण्याशी विलंब होतो. यादरम्यान, अनेकांना बिल्डरकडून नुकसान भरपाई मिळू शकत नाही, त्यामुळे फ्लॅट खरेदी करताना झालेल्या 1 मोठ्या चुकीबद्दल लोकांना माहिती असले पाहिजे.

मालमत्तेचा ताबा घेताना घ्यायची काळजी

मालमत्तेचा ताबा घेताना घ्यायची काळजी

मुंबईतील एका कुटुंबाला फ्लॅटचा ताबा मिळण्यास 2 वर्षांपेक्षा जास्त विलंब झाला आणि शिवाय बिल्डरकडून नुकसान भरपाई मिळू शकली नाही. मुंबईतील अंदाजे 1.05 कोटी किमतीच्या फ्लॅटशी संबंधित प्रकरण समोर आले असून या कुटुंबाने 25 फेब्रुवारी 2022 रोजी बिल्डरसोबत विक्रीचा करार केला होता. या करारानुसार 30 जून 2022 पर्यंत फ्लॅटचा ताबा मिळणार होता, पण कुटुंबाला 15 मार्च 2025 रोजी ताबा मिळाला. म्हणजे तब्बल दोन वर्षांनी घरमालकाला ताबा मिळाला. अशा परिस्थतीत, घर खरेदीदाराला ताबा मिळण्यास झालेल्या विलंबाबद्दल नुकसान भरपाई मिळायला हवी होती, पण तसं झाले नाही.

ताबा घेताना कोणताही आक्षेप नाही घेतला

ताबा घेताना कोणताही आक्षेप नाही घेतला

त्या कुटुंबाने नंतर विलंबाबाबत महारेराकडे तक्रार दाखल केली आणि नुकसान भरपाईची मागणी केली. या विलंबामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास झाल्याबद्दल दावा करून वार्षिक पेमेंटवर 18% वार्षिक व्याजाची मागणी केली. 15 मार्च 2025 पर्यंत ही रक्कम अंदाजे 50.6 लाख रुपये असल्याचे या कुटुंबाने म्हटले, पण प्राधिकरणाने कुटुंबाकडून झालेल्या चुकीचे कारण देत नुकसान भरपाई देण्यास नकार दिला.

वेळेवर तक्रार दाखल केली नाही

वेळेवर तक्रार दाखल केली नाही

ताबा घेण्यास झालेल्या विलंबाबाबत कुटुंबाने औपचारिक आक्षेप दाखल केला नाही, हा अशा परिस्थितीत, या प्रकरणात MahaRERA समोरील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. तसेच ताबा घेताना कुटुंबाने औपचारिक निषेधही नोंदवला नव्हता. कुटुंबाने 10 मार्च 2025 रोजी बिल्डरला पैसे दिले होते, पण बिल्डरने कथितरित्या पावती दिली नाही आणि काही दिवसांनंतर 15 मार्च रोजी कुटुंबाने फ्लॅटचा ताबा घेतला. बिल्डरने अद्याप औपचारिक पझेशन पत्र जारी केले नव्हते.

नुकसान भरपाईची मागणी फेटाळली

नुकसान भरपाईची मागणी फेटाळली

त्यामुळे कुटुंबाने ताबा घेतल्यानंतर इतक्या उशिरा विलंबाबाबत तक्रार करता येत नाही, महारेराने म्हटले. तर, घर खरेदीदाराने बांधकाम पूर्ण करून ताबा घेण्यापूर्वीच आपला आक्षेप दाखल करायला हवा होता, असे, प्राधिकरणाने सांगितले. याशिवाय बिल्डरने विक्री करारामध्ये नमूद केलेल्या सर्व सामायिक जागा आणि सुविधा पुरवल्या नाही, असाही कुटुंबाने आरोप केलेला पण, महारेरा या आरोपांच्या समर्थनार्थ पुरेशी फोटो, कागदपत्रे किंवा इतर पुरावे सादर करू शकले नाही. त्यामुळे, या आधारावरही कुटुंबाला दिलासा नाकारला.

घर खरेदीदारांसाठी यातून काय बोध होतो?

घर खरेदीदारांसाठी यातून काय बोध होतो?

या प्रकरणातून घारेदीदारांनी घ्यायचा धडा म्हणजे, बिल्डरने फ्लॅटचा ताबा देण्यास विलंब केला आणि खरेदीदाराला नुकसान भरपाई किंवा व्याजाची मागणी करायची असेल, तर ताबा घेतानाच लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे. तसेच ताब्यासंबंधीची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा, कोणत्याही दोषांचे फोटो आणि व्हिडिओ जपून ठेवा आणि बिल्डरकडे लेखी तक्रार दाखल करा व पेमेंटच्या पावत्या आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवाजेणेकरून भविष्यात कायदेशीर वाद निर्माण झाल्यास या नोंदी उपयोगी पडतील.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा