Headlines

Titan Ltd Share Price Today; बाजाराच्या मूड स्वींगमध्ये 7 महिन्यांत 80000 कोटींचा परतावा, श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा TATA शेअर बनला रॉकेट


TATA Group Stock News Today: सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, भारतीय शेअर मार्केटमध्ये वर-खाली व्यवहार होताना दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट व्यवहार करत असताना टाटा ग्रुपचा दिग्गज स्टॉक मात्र तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. तिमाही कामगिरीच्या जोरावर टाटा समूहाचा करोडपती स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ झाली आणि अनेक ब्रोकरेज कंपन्यांही बुलिश दिसत आहे.

TATA Group Titan Ltd Share Price Today 10 August 2026
श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा TATA शेअर बनला रॉकेट(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराचे सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी, वर-खाली सुरूच आहेत. गेल्या आठवड्याच्या दमदार तेजीनंतर देशांतर्गत बाजारावर दबाव दिसत असून टाटा समूहाची दिग्गज कंपनी – टायटन लिमिटेड – शेअरनी तेजीची उसळी घेतली आणि गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला.

सपाट बाजारात टाटा स्टॉक सुस्साट सुटला

देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी, टाटा ग्रुपची कंपनी – टायटन शेअर्स – नी सोमवारी सुस्त पडलेल्या बाजारात 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजाराचे ‘बिग बुल’ म्हणून ओळख मिळवून देणारा टायटन स्टॉक जवळपास दोन वर्षांच्या कमी परताव्यांनंतर पुन्हा एकदा गुंतवणूकदारांमध्ये पसंतीचा स्टॉक बनला आहे.

Maharashtra Timesशिक्षक मागताहेत गलेलठ्ठ पगार, OPS, रिटायरमेंटचे वय अन् भरपूर सुट्ट्या; मॅरेथॉन बैठकीनंतर 8व्या वेतन आयोगातील नवीन अपडेटयावर्षी कंपनीचे बाजार मूल्य तब्बल 80,000 कोटींनी वाढले त्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. यापैकी दागिन्यांची स्थिर मागणी, सोन्याच्या स्थिर किमती, संघटित दागिन्यांच्या बाजाराचा वाढता वाटा, तनिष्क आणि कॅरेटलेनची दमदार कामगिरी यांसारख्या घटकांचा समावेश आहे.

Maharashtra TimesGold Rate Today: ऑगस्टच्या दुसऱ्या सोमवारी गुंतवणूकदारांना सुगीचे दिवस; सोन्याचा भाव दीड लाखांच्या पार, चांदीची जोरदार मुसंडी

सुस्त पडलेल्या टायटन स्टॉकची उभारी

गेल्या दोन वर्षांत टायटन शेअरने जवळपास स्थिर परतावा दिला असताना गुंतवणूकदारांना काय करायचं सुचेना झालेलं. त्याचवेळी, गेल्या आठवड्यात, शुक्रवारी, टायटन स्टॉकने 4,943 रुपायंवर क्लोजिंग केलेली आणि 4,977.20 रुपयांवर ओपन झाला. त्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत 3 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी घेऊन 5,121.30 रुपयांवर पोहोचला, जो या स्टॉकचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यासोबतच कंपनीचे एम-कॅपही 4.5 लाख कोटींवर पोहोचले.

टायटन कंपनी लिमिटेडमध्ये रेखा झुनझुनवाला यांचा 5.3% हिस्सा असून प्रमोटर्सकडे 52.90 टक्के, तर FIIs कडे 15.4 टक्के हिस्सा आहे.

Maharashtra TimesGold Exchange: 32 ग्रॅम सोने अन् 35000 रुपये; जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन अंगठी बनवायचं आश्वासन देऊन ग्राहकाची फसवणूक, आता न्यायालयाने दिले आदेश

टायटन स्टॉकची कामगिरी

त्याचवेळी, स्टॉकमध्ये आतापर्यंत टाटा ग्रुपच्या टायटन स्टॉकने दणदणीत परतावा दिला आहे. मागील तीन महिन्यांत शेअरचा भाव 11 टक्क्यांनी वाढला तर, एका वर्षात या स्टॉकमध्ये 44.73 टक्के वाढ झाली आणि यादरम्यान, सेन्सेक्स निर्देशांक केवळ 1.66% वधारला. तसेच दोन वर्षांत शेअरची किंमत 50% वाढली असून ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपासून टायटनचे शेअर्स खरेदी केली आणि अजूनही होल्ड करून ठेवले असतील त्यांना 1136% नफा झाला असेल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा