मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हे आपल्या दमदार अभिनयासोबतच सामाजिक आणि चालू घडामोडींवर स्पष्ट मते मांडण्यासाठी ओळखले जातात. नुकतेच देशभरात गाजलेल्या ‘जेन झी’ तरुणांचे आंदोलन आणि नीट परीक्षेच्या गोंधळावरून शिक्षणम
.
‘तरुणांना सगळं झटपट हवंय, पण अभ्यास नाही’
मुलाखतीत जेन झी आंदोलनाबद्दल बोलताना प्रशांत दामले म्हणाले, “मी आवाहन केले आणि मंत्र्याने राजीनामा दिला, असे काही होत नसते; हा केवळ योगायोग असू शकतो. तरुणांचे प्रश्न आणि त्यांच्या इच्छा वेगळ्या असतात, हे नक्की. त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि योग्य वेळी उत्तर देणे गरजेचे आहे. पण हल्लीच्या या तरुण पिढीला सगळं काही झटपट (Instant) हवं असतं. एखाद्या प्रश्नावर दोन दिवसांनी उत्तर देतो, असे सांगितले तर त्यांना चालत नाही. त्यांच्याकडे नवीन साधने असल्यामुळे ते आपल्यापेक्षा फास्ट आहेत, हे मान्य करावेच लागेल.”
50 पैकी 40 मुले अर्धवट माहितीवर गाडी ढकलतात
आंदोलक आणि तरुणांच्या अभ्यासपूर्ण भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दामले म्हणाले, “अनेकदा ही मुले अर्धवट माहितीच्या आधारेच आपली गाडी ढकलत असतात. 50 मुलांचा गट असेल, तर त्यातील फक्त 10 मुले खरोखर हुशार आणि अभ्यासपूर्ण बोलणारी असतात; उरलेली 40 मुले फक्त अर्धवट माहितीवर उड्या मारतात. मग ते सरकार असो वा दुसरे कोणतेही क्षेत्र, जे 10 जण खरोखर अभ्यास करून बोलतात, त्यांना ओळखता आले पाहिजे आणि त्यांच्याच मतांवर लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे.”
नीटचा फुलफॉर्म तरी माहिती आहे का?
सध्या सुरू असलेल्या आंदोलनांचा समाचार घेताना त्यांनी एक अत्यंत मर्मभेदक सवाल उपस्थित केला. “मी त्या ४० अर्धवट अभ्यास असलेल्या मुलांबद्दल बोलत आहे. ज्या विषयावर तुम्ही रस्त्यावर उतरला आहात, किमान त्या ‘NEET’ परीक्षेचा फुलफॉर्म तरी तुम्हाला माहिती आहे का? जर तेच माहिती नसेल, तर केवळ घोषणा देऊन काय उपयोग? कोणत्याही विषयावर आंदोलन करताना किंवा तिथे जाताना तुम्हाला त्यातील फायदे-तोटे, येणारे अडथळे यांची पूर्ण आणि सखोल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.”
अर्धवट माहितीवर आरोप करणे चुकीचे
सध्याच्या मुलांना गरजेपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळाले आहे, असे सांगताना ते पुढे म्हणाले, “मुलांना स्वातंत्र्य नको, असे म्हणण्याआधी आपण त्यांच्यापेक्षा हुशार असायला हवे, जेणेकरून त्यांच्या प्रश्नांना आपण योग्य काऊंटर करू शकू. मी गेल्या 44 वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. 1983 ते 2008 या काळात मी केवळ कलाकार होतो, पण या प्रवासात मी निर्मात्याला येणाऱ्या अडचणीही समजून घेतल्या. त्यामुळेच मला असे वाटते की, विषयाचा कोणताही सखोल अभ्यास न करता, केवळ अर्धवट माहितीच्या आधारे कोणावरही आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे.” प्रशांत दामले यांच्या या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर आणि तरुण वर्गात याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…
बीडमध्ये एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही: मनोज जरांगे पाटलांचा दावा तथ्यहीन, महसूल विभागाचा खुलासा

बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून रद्द करण्यात आलेले नाही. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर केलेले दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असा स्पष्ट आणि अधिकृत खुलासा बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला सादर केलेल्या चौकशी अहवालात केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
