Headlines

Raj Thackeray On Third Mumbai: ‘तिसरी मुंबई’ नेमकी कुणाच्या फायद्यासाठी ? राज ठाकरे यांचा सरकारला प्रश्न – raj thackeray asks govt for whose benefit third mumbai is being planned


म. टा. वृत्तसेवा, अलिबाग: रायगडमध्ये पेणजवळ ‘तिसरी मुंबई’ उभारण्याची तयारी सुरू असताना, ‘या प्रकल्पाचा रायगडमधील स्थानिकांना नेमका काय फायदा होणार’, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी उपस्थित केला. मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी रायगडमध्ये आलेल्या राज यांनी यावेळी सरकारच्या विकास धोरणावर जोरदार हल्लाबोल केला.

‘एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, संशोधन संस्था, व्यावसायिक केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, तसेच जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि सेवा उद्योग तिसऱ्या मुंबईत आणले जाणार असतील, तर त्यासाठी रायगडमधील मुला-मुलींना आवश्यक कौशल्य देण्याची तयारी सरकारने केली आहे का? कोकणात आजवर अनेक विकास प्रकल्प आले. मात्र, त्याचा स्थानिकांना किती फायदा झाला आणि कोकणातील किती मुला-मुलींना रोजगार मिळाला, याचा हिशेब सरकारने द्यावा’, अशी मागणी राज यांनी केली.

Maharashtra TimesKolhapur Politics : मुश्रीफ आणि घाटगे एकत्र; ही युती नाही महायुती, फडणवीसांची टोलेबाजी; दिली फेविकोल जोडाची उपमाशेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्यानंतर ते केवळ माजी जमीनमालक राहणार आणि त्यांच्या डोळ्यांसमोर तिसरी मुंबई उभी राहणार, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. ‘तुमच्या पायाखालची जमीन विकली जाणार आणि महाराष्ट्रही असाच विकला जाणार. त्यामुळे स्थानिकांनी या संपूर्ण प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहून आपल्या जमिनी आणि भविष्यासंदर्भात जागरूक राहावे’, असे आवाहन राज यांनी केले.

Maharashtra TimesRadhakrishna Vikhe Patil : मनोज जरांगे यांची भेट घेणार, आरक्षणाच्या कायदेशीर पेचातून मार्ग काढणार, विखे पाटील यांची भूमिका‘मुंबई-गोवा महामार्गासाठी टक्केवारी’

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरूनही राज ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. ‘राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्गाचे काम रखडले आहे. कंत्राटदार काम सोडून गेल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. मात्र, कंत्राटदार कोणामुळे कंटाळले? महामार्गाचे भूसंपादन पूर्ण न करताच कंत्राटे देण्यात आली. सरकारने कंत्राटदाराला पैसे दिले आणि त्यातून ‘टक्केवारी’ घेण्यात आली; मात्र रस्ता तिथेच राहिला. हा रस्ता विकासासाठी नव्हे, तर किती टक्के मिळतील यासाठी केला जात आहे’, असा गंभीर आरोप राज यांनी केला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत