आम्ही सगळे मित्र विजू माने यांच्या ऑफिसमध्ये वेळ घालवायला जायचो. आमच्याकडे फारसं काम नसायचं, त्यामुळे गप्पा, टाइमपास करणं हा आमचा मुख्य उद्योग होता. मात्र विजू दादांकडे नेहमी काही ना काही काम सुरू असायचं. एके दिवशी त्यांनी ‘यूट्यूबसाठी काहीतरी मजेशीर करू या’ ही कल्पना मांडली. त्यांनी एक भाग लिहिला, आम्ही तो शूट केला आणि यूट्यूबवर प्रदर्शित केला. सुरुवातीला हा फक्त एक प्रयोग होता; पण प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
प्रेक्षकांकडून सतत विचारलं जायचं, की ‘स्टगलरचा सिनेमा कधी येणार ?’ मात्र केवळ लोकप्रियता आहे म्हणून चित्रपट करायचा, असा आमचा विचार नव्हता. सिनेमासाठी योग्य आणि दमदार कथा मिळाली पाहिजे, असं विजू यांचं म्हणणं होतं. अखेर आमच्या आयुष्यात घडलेल्या एका खऱ्या घटनेनं चित्र बदललं. त्या प्रसंगात विनोद होता, मैत्री होती, गोंधळ होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात ‘स्ट्रगलर्स’च्या पात्रांचा आत्मा होता. त्या कल्पनेवर काम सुरू झालं आणि हळूहळू ‘ मामाच्या गोव्याला जाऊया ‘चा जन्म झाला.
हा चित्रपट तुझ्यासाठी नेमका काय आहे?
अनेक वर्षांपासून आम्ही मित्र एकत्र संघर्ष करत आलो आहोत, काम केलं आहे आणि एकत्र अनेक स्वप्नं पाहिली आहेत. त्यापैकी हे एक मोठं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे. त्यामुळे हा सिनेमा आमच्या मैत्रीचा आणि प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. चित्रपट पाहून प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा, अशी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी भावनिकदृष्ट्याही खूप खास आहे.
Mohammad Rafi Song: या गाण्याशीवाय लग्न अपूर्णच! गेल्या ५० वर्षांपासून ऐकलं जातंय मोहम्मद रफींचं हे ‘कल्ट क्लासिक’ गाणं
‘चला हवा येऊ द्या’नंतरचा काळ तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होता ?
‘चला हवा येऊ द्या‘ नंतर माझ्या आयुष्यात एक कठीण टप्पा होता. त्या काळानं मला आतून हादरवून टाकलं होतं.अशा वेळी मला सावरलं, ते माझ्या मित्रांनी. विजू माने मला रोज फोन करून ऑफिसमध्ये बोलवायचा. तिथे जाऊन मी जाहिराती लिहायचो, गाण्यांच्या ओळी सुचवायचो, विविध कल्पनांवर काम करायचो. मी कामात गुंतून राहिलो. माझा मित्र अमोल पणशीकर यानंही त्या काळात मला आधार दिला. त्या काळात माझ्या मित्रांनी मला एकटं पडू दिलं नाही आणि त्यामुळेच मी त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकलो.
Salman Khanच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू
संघर्षामुळे खचलेल्या तरुणांना तू काय सांगशील? गेल्या दोन वर्षात मी केलेले तीन चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाला. माझ्या कामाचंही कौतुक झालं. त्यामुळे संघर्षांचा काळ कायमचा नसतो, हे मी स्वतः अनुभवलं आहे. संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि माणसं जपा. योग्य वेळी मेहनतीचं फळ मिळतं. जेव्हा काम नसतं, आत्मविश्वास ढासळतो आणि भविष्य धूसर वाटू लागतं; अशा वेळी स्वतःला एकटं पाडू नका. तुमच्या माणसांशी बोला, मित्रांशी संवाद ठेवा आणि स्वतःला कामात गुंतवून ठेवा.
Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद
यांच्याविषयी काय वाटतं?
हेमांगी कवी: तिच्यात एक विलक्षण ‘ऑफबीट कॉमिक टायमिंग’ आहे. सुगंध आणि परफ्यूम्सची तिची आवडही तितकीच खास असून, त्या क्षेत्रातील तिचं ज्ञान प्रभावी आहे.
हृषिकेश जोशी: कायम एकत्र नाटक करू या असं सांगतो; मात्र अजूनही ते नाटक मिळालेलं नाही. उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्याच्याबद्दल मनात कायम आदराची भावना आहे.
श्रेया बुगडे : केवळ सहकलाकार नाही, तर आयुष्यात देवानं पाठवलेल्या खास माणसांपैकी एक आहे. एकमेकांच्या सुख-दुःखाची मनापासून काळजी घेणारी ती माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे.
भरत जाधव : पहिली मोठी संधी देऊन माझ्या कारकिर्दीला नवी दिशा मिळवून दिली. वडिलांच्या उपचारांसाठी आर्थिक संघर्ष सुरू असताना मिळालेलं काम आणि पाठबळ; यासाठी त्यांचा ऋणी राहेन.
भाऊ कदम: संघर्षापासून यशापर्यंतचा मैत्रीचा सुंदर प्रवास आहे. ट्रेन, बस, सेकंड हँड कार ते स्वतःच्या गाड्यांपर्यंतचा प्रवास दोघांनी एकत्र अनुभवला आहे.
कौतुक मित्राचं !
या चित्रपटाशी माझं नातं केवळ अभिनेता म्हणून नाही, तर मित्र म्हणूनही आहे. विजू माने यांनी हा चित्रपट उभा करण्यासाठी मोठा आर्थिक धोका पत्करला आहे. त्यांनी त्यांच्या घरांतील दागिन्यांवर कर्ज काढून ते पैसे सिनेमासाठी लावले आहेत. त्यामुळे हा चित्रपट चालावा, यशस्वी व्हावा, अशी इच्छा केवळ व्यावसायिक नाही, तर भावनिकही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला स्वीकारावं आणि त्याच्यावर प्रेम करावं, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट असेल.

