Headlines

Mrunal Thakur : 10 वर्षांनी लहान यशस्वी जैस्वालसोबत अफेअरच्या चर्चा, मृणाल ठाकूरनं सोडलं मौन; काय म्हणाली अभिनेत्री?


Mrunal Thakur : मृणाल ठाकूर आणि यशस्वी जैस्वाल यांच्या डेटिंगच्या चर्चा होत होत्या. यावर आता मृणालनं मौन सोडलं आहे.

Mrunal Thakur
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मनोरंजन विश्व आणि क्रिकेट यांचं नेहमीच एक घनिष्ठ नातं राहिलं आहे. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न करून संसार थाटला आहे, तर अनेक अभिनेत्री क्रिकेटपटूंसोबतच्या त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत राहतात. काही दिवसांपासून क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालसोबत मृणाल ठाकूरच्या अफेअरच्या चर्चा होत आहेत. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एकाच कॅफेमधून बाहेर पडताना दिसल्यानंतर ३४ वर्षीय अभिनेत्री मृणाल आणि २४ वर्षीय यशस्वी यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. मृणाल आणि यशस्वी यांचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अशातच आता आता मृणाल ठाकूरनं या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray यांची अमिर खानच्या लग्नात हजेरी, Gunaratna Sadavarte यांचा हल्लाबोल

क्रिकेटपटू यशस्वीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मृणालनं मौन सोडलं

यशस्वीसोबतच्या व्हायरलव्हिडिओवर कमेंट करत मृणालनं लिहिलं की, ‘Bro Relax… तुम्ही आम्हाला कुठे एकत्र पाहिलंत? तुम्ही एवढे शिकलेले असून अशा अफवांवर कसा काय विश्वास ठेऊ शकता? देशात इतर गोष्टीसुद्धा घडत आहेत. जेन झींकडून काहीतरी शिका आणि योग्य विषयावर व्हिडिओ बनवा, त्यामुळे जास्त व्ह्यूज मिळतील.’ मृणालनं केलेली कमेंट डिलीट करण्यात आली आहे. मात्र, या कमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मृणालचे चाहतेही अभिनेत्रीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

Mrunal Thakur Comment

धनुषसोबत अफेअरच्या चर्चा

मृणालच्या अफेअरच्या अफवा समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, २०२५ मध्ये मृणाल ठाकूरचं नाव अभिनेता धनुषसोबत जोडलं गेलं होतं. २०२६ मध्ये धनुष आणि मृणाल लग्न करणार असल्याच्या चर्चाही झाल्या. पण, दोन्ही कलाकारांनी आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.

Maharashtra TimesPrajakta Mali : ‘मी अधिकृतपणे क्रूरतामुक्त झालेय’, वाढदिवशी प्राजक्ता माळीचा महत्वाचा निर्णय, पोस्ट करत दिली माहिती

मृणाल ठाकूरचं वर्क फ्रंट

मृणाल ठाकूर अलीकडेच ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात दिसली होती. या सिनेमात वरुण धवन आणि पूजा हेगडे यांच्याही भूमिका होत्या. यानंतर, मृणाल हुमा कुरेशीसोबत ‘पूजा मेरी जान’ या चित्रपटात दिसणार आहे. हा कोर्टरूम ड्रामा ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.