Headlines

ला केलेलं दूर, काय घडलेलं?


Pradeep Rawat and Salman Khan:बॉलिवूड तसंच साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन झालंय. रावत यांच्या निधनानंतर त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. यात आता त्यांच्या आणि सलमान खानच्या मैत्रीचा किस्सा व्हायरल होत आहे.

Pradeep Rawat and Salman Khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई:बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खलनायकाची दमदार भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी रावत यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या. यात अभिनेता सलमान खान याचीही पोस्ट चर्चेत आली. खूप कमी जणांना माहिती आहे की, सलमान खान आणि दिवंगत प्रदीप रावत यांच्या चांगली मैत्री होती. स्वत: रावत यांनी एका जुन्या मुलाखतीत त्यांच्या आणि सलमानच्या मैत्रीबद्दल सांगितलं होतं.

सलमान खान आणि त्यांच्या मैत्रीबद्दल सांगताना रावत यांनी खास किस्सेही सांगितले होते. प्रदीप रावत यांनी सांगितलं होतं की, आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात ते तब्बल ६ महिने सलमान खानच्या वांद्र्यातल्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमध्ये राहिले होते.

“गॅलेक्सीमध्ये मी अतिशय कम्फर्टेबल झालो होतो”

प्रदीप रावतयांनी ‘बागी’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम केलं होतं. तेव्हापासूनच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. प्रदीप रावत यांनी सांगितलं होतं की, जेव्हा ते मुंबईत राहण्यासाठी जागेचा शोध घेत होते, तेव्हा सलमान खाननं त्यांना आपल्या घरी राहण्याचा प्रस्ताव दिला. मुलाखतीत आठवणींना उजाळा देताना प्रदीप रावत म्हणालेले की,सलमानचं मन अतिशय मोठं आहे. तो आणि त्याचं कुटुंब अत्यंत आदरातिथ्य करणारे आहे. मी त्यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तब्बल ६ महिने राहिलो. तिथं राहताना सलमान आणि त्याच्या कुटुंबानं मला कधीही परकेपणाची जाणीव होऊ दिली नाही. मी तिथं इतका कम्फर्टेबल झालो होतो की, मला ते स्वतःचंच घर वाटू लागलं होतं. आम्ही एकत्र वर्कआउट करायचो, तिथंच जेवायचो आणि तिथूनच कामासाठी बाहेर पडायचो. इतकंच नाही तर एखाद्या मोठ्या पार्टीला जाण्यासाठी माझ्याकडं सूट नसायचा, तेव्हा सलमान स्वतः माझ्यासाठी सूट आणायचा, असंही रावत यांनी म्हटलेलं.

Maharashtra TimesUsha Nadkarni Awards:’माझ्या पेक्षा लहान अभिनेत्रींना पुरस्कार, माझं वय वाढलंय, पण’ जीवनगौरव पुरस्कारावर स्पष्टच बोलल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी
रावत यांनी असंही सांगितलं होतं की, सलमान केवळ चित्रपटांमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही लोकांची मदत करण्यासाठी नेहमी पुढं असतो. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमानचे वडील सलीम खान, आई आणि संपूर्ण कुटुंब प्रत्येकाची खूप काळजी घेतं, असंही त्यांनी नमूद केलं होतं. ६ महिने राहिल्यानंतर जेव्हा प्रदीप रावत काही गोष्टींची जाणीव झाली. की सलमानच्या घरी आपल्याला सहज सगळ्या गोष्टी मिळत आहेत. याची सवय न लागलेलीच बरी. करिअर करायचं असेल तर आपल्याला बाहेर पडून स्वत:चं काही तरी केलं पाहिजे. सहा महिन्यानंतर ते सलमानच्या घरातून बाहेर पडले, त्यांना राहण्याचं ठिकाण मिळालं. त्यांनी काम शोधायला सुरुवात केली. बराच काळ ते सलमानच्या संपर्कातही नव्हते, याची कबुली रावत यांनी दिली होती.

Maharashtra TimesAmeesha patel on Marriage: ‘५१ व्या वर्षी निम्म्या वयाची मुलं डेटसाठी विचारतात’; लग्नाच्या प्रश्नावर स्पष्टच बोलली अमीषा पटेल
प्रदीप यांच्या निधनानंतर सलमान खाननं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी: अ रिबेल फॉर लव्ह’ चित्रपटातील प्रदीप रावत यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत सलमाननं लिहिले, “भावा, तुझ्यासोबत खूप चांगले क्षण घालवले, तुझ्या आत्म्याला शांती लाभो.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा