Headlines

गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढवा ; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या बैठकीत सूचना


Chhatrapati Sambhajinagar News:छत्रपतीनगर शहर पोलिसांना पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या बैठकीत सूचीत करण्यात आल. राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी शहर पोलिस आयुक्तालयात गुरूवारी आढावा बैठक घेतली.यावेळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार सह विशेष पोलिस महानिरीक्षक मिश्र यांची उपस्थिती होती.

गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढवा
म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : या बैठकीत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे शहर पोलिस आयुक्तालय हद्दवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. याशिवाय नवीन पोलिस ठाण्याबाबतही प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती दिली. या माहितीवर पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी हद्दवाढीसह पोलिस ठाणे वाढविण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे शहर पोलिस आयुक्तालय हद्दवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. याशिवाय नवीन पोलिस ठाण्याबाबतही प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती दिली. या माहितीवर पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी हद्दवाढीसह पोलिस ठाणे वाढविण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

एकूण ११ जिल्ह्यांत अपघात रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एकूण ११ जिल्ह्यांत अपघात रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अपघातात प्राणांकित अपघात रोखण्यासाठी असे उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याबाबत यावे. असे नियोजन आहे. तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई वाढविणे आवश्यक आहे. तसेच जेव्हापर्यंत कोर्टात एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होत नाही. तोपर्यंत गुन्हेगारांवर वचक बसत नाही. यामुळे गुन्हे प्रकटीकरणात वाढ होणे आवश्यक असल्याच्या सूचना राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी दिल्या.

Maharashtra TimesBhandara Crime : भंडाऱ्यात संतापाचा उद्रेक! चिमुकलीला आमिष देऊन सार्वजनिक शौचालयात नेलं, अत्याचार करताच बालिकेची आरडाओरड; दरवाजा उघडताच…

विविध कार्यांचा आढावा घेण्यात आला

पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी गुरूवारी (६ ऑगस्ट) पोलिस आयुक्तालयात छत्रपतीनगर शहर पोलिस, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रांतर्गत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, धाराशिव या शहरामधील गुन्ह्यांचा आढावा तसेच पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक तसेच पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या विविध कार्यांचा आढावा घेतला.

Maharashtra TimesPune Crime : शाळेपासून अफेअर, पुण्यात जाताच निकिता विसरली; संतप्त तरुणाने हिंजवडी गाठली, एक्सच्या प्रियकराला जीवानिशी संपवलं

गोवंश हत्या तसेच अन्य कारवाईबाबत माहिती सादर केली.

या वेळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्यासह जालना आणि धाराशिव येथील पोलिस अधीक्षक यांचीही उपस्थिती होती. या वेळी शहर पोलिस आयुक्तालयातर्फे शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण, गुन्हेगारांवर केलेल्या कारवायांसह अमली पदार्थ विरोधात केलेली कारवाई; त्याच प्रमाणे गोवंश हत्या तसेच अन्य कारवाईबाबत माहिती सादर केली. अशीच माहितीछत्रपती संभाजीनगरग्रामीण, जालना, धाराशिव येथील पोलिस अधीक्षकांनीही सादर केली.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा