Headlines

Jyothi Reddy Success Story; अनाथाश्रामात बालपण, दहावी होताच लग्न; मग अमेरिकेत एका महिलेने कशी उभारली 9000 कोटींची कंपनी

Who is Jyothi Reddy: ज्योती रेड्डींचा प्रवास जिद्द आणि अदम्य इच्छाशक्तीचे उत्तम उदाहरण आहे.भारतातून अमेरिकेपर्यंतचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले आणि अनेक अडथळे पार करून कोट्यवधी रुपयांच्या कंपनीच्या मालक बनल्या. ज्योती रेड्डींचा प्रवास दर्शवतो की अदम्य इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय कोणत्याही व्यक्तीला अशक्य गोष्टही साध्य करण्यास मदत करू शकतात.

Jyothi Reddy Success Story
Success Story: आयुष्यात काहीतरी साध्य करण्याची इच्छाशक्ती असते तेव्हा संघर्ष आणि आव्हाने केवळ छोटे स्पीड-ब्रेकर असतात. ही यशोगाथा अशा एका महिलेची आहे, जिचे बालपण आणि तारुण्य अत्यंत गरिबी व वंचनेत गेले. तरीही स्वबळावर काहीतरी साध्य करण्याची इच्छा नेहमीच मनात होती. एकेकाळी पाच रुपये रोजंदारीवर काम करणारी ही महिला आज अमेरिकेत स्वतःची अब्ज डॉलर्सची सॉफ्टवेअर कंपनी चालवते.

5 रुपये मजुरी ते सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओ

5 रुपये मजुरी ते सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओ

काही यशोगाथा खरोखरच प्रेरणादायी असतात, मनाला उभारी देणाऱ्या असतात आणि ज्योती रेड्डी यांची कहाणी याचे उत्तम उदाहरण आहे. ज्योती यांनी असंख्य आव्हानांचा सामना केला आणि आज एका अब्ज-डॉलरच्या सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओ बनल्या आहेत. आयुष्यात अनेक आव्हाने आली तरीही त्यांनी कधीच हार मानली नाही.

कोण आहेत ज्योती रेड्डी

कोण आहेत ज्योती रेड्डी

तेलंगणातील वारंगल येथे जन्मलेल्या ज्योती रेड्डी यांचे वडील अत्यंत गरीब होते आणि आर्थिक अडचणींमुळे पाच मुलांपैकी दुसऱ्या ज्योतीला वयाच्या आठव्या वर्षी अनाथाश्रमात सोडले. येथे ज्योतीला पुरेसे अन्न आणि सरकारी शाळेत जाण्याची संधी मिळाल्या.

16 व्या वर्षीच लग्न झालं

16 व्या वर्षीच लग्न झालं

तेलंगणातील रहिवासी ज्योती रेड्डींचे वडील रोजंदारीवर मजुरीचे काम करायचे. वयाच्या आठव्या वर्षी अनाथाश्रमात दाखल केलेल्या ज्योती अत्यंत खडतर परिस्थितीत लहानाच्या मोठ्या झाल्या. गरीब कुटुंबातील 5 मुलांपैकी दुसरी मुलगी ज्योतीने अनाथाश्रमात राहूनच सरकारी शाळेत शिक्षण घेतले. वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न झाल्यावर ज्योती यांच्या आयुष्याला एक मोठे वळण मिळाले आणि 18 व्या वर्षापर्यंत पदरात दोन मुली होत्या.

पाच रुपये मजुरीवर काम केलं

पाच रुपये मजुरीवर काम केलं

आर्थिक परिस्थितीत हलाखीची असल्यामुळे ज्योती शेतात पाच रुपये मजुरीवर काम करू लागल्या. 1985 ते 1990 पर्यंत असंच सुरू होतं. त्यानंतर एका सरकारी योजनेअंतर्गत शिक्षिकेची नोकरी मिळाली आणि रात्रीच्या वेळी कपडे शिवून थोडे पैसे कमवू लागली. इथून त्यांच्या आयुष्यात बदल घडू लागला, मात्र ज्योती रेड्डीने आपली परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला होता. (प्रातिनिधिक फोटो)

शिक्षणाने नशीब बदलले

शिक्षणाने नशीब बदलले

8-9 तास काम केल्यावर लोक थकून घरी येताच सोफा किंवा पलंगावर जाऊन पडता. पण, एवढं काम करूनही ज्योती आपल्या अभ्यासासाठी वेळ काढायच्या आणि केवळ शिक्षणच नव्हे तर कौशल्येही आत्मसात करण्यावर भर दिला. ज्योतीने टायपिंग शिकले आणि एका शाळेत रुजू झाल्या. 1994 मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर ओपन विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली आणि 1997 मध्ये काकतीय विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांना शाळेतील शिक्षिका म्हणून 398 रुपये पगार मिळू लागला आणि मुलींनाही मिशनरी शाळेत दाखल केले. सगळं सुरळीत सुरू होतं पण, ज्योती नाखूष होत्या. (प्रातिनिधिक फोटो)

अमेरिकन ड्रीमच्या दिशेने भरारी

अमेरिकन ड्रीमच्या दिशेने भरारी

या दरम्यान, ज्योतीची चुलत बहीण अमेरिकेतून परतली आणि बहिणीच्या मदतीने त्यांनी अमेरिकेला जाण्याचं ठरवलं. सुरुवातीला हाताला मिळेल ते काम केलं. व्हिसासाठी कार्यालय आणि न्यायालयात वारंवार जावे लागायचे पण, या दरम्यान ज्योतीच्या लक्षात आले की व्हिसासाठी लोक वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होते. त्यानंतर ज्योतीने व्हिसाच्या बाबींवर सल्ला देण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले.

अमेरिकेत उभारलं अब्जावधींचं साम्राज्य

अमेरिकेत उभारलं अब्जावधींचं साम्राज्य

ज्योतीकडे ना कोणती गुंतवणूक होती, ना कोणी मार्गदर्शन करणारं, कोणतीही योजना नव्हती आणि नशिबानेही साथ दिली नव्हती. पण एकेकाळी शेतात 5 रुपयांसाठी काम करणाऱ्या ज्योतीने अमेरिकेत स्वतःच्या हिमतीवर ‘की सॉफ्टवेअर सोल्युशन्स’ नावाची IT सर्व्हिस कंपनी सुरू केली. आज ज्योती अमेरिकेतील फिनिक्स शहरात स्थायिक असून अमेरिकेत सहा घरे तसेच, भारतातही अनेक फ्लॅट्स आणि मालमत्ता आहेत. याशिवाय Key Software Solutions ने 125 कोटी ते 142 कोटी रुपयांहून जास्त कॉर्पोरेट उलाढाल आणि मूल्यांकन साध्य करून दाखवले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा