![]()
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद भंडाऱ्यात उमटले आहेत. या विधानाचा भंडारा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निषेध नोंदवण्यात आला. गांधी चौकात तीव्र निदर्शने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन यांच्या सूचनेनुसार, तसेच जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे व प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात भंडारा येथील ऐतिहासिक गांधी चौकात महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर हे निषेध आंदोलन छेडण्यात आले. काँग्रेसविरोधात घोषणाबाजी निषेध आंदोलनादरम्यान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. “महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. येथे महिलांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही. काँग्रेसने केलेले वक्तव्य हे केवळ सुनेत्रा पवारांचा नव्हे राज्यातील प्रत्येक महिलेचा आणि मातृशक्तीचा अपमान आहे,” असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. या बेजबाबदार वक्तव्याबद्दल काँग्रेसने राज्यातील सर्व महिलांची बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई मदनकर, डॉ. रवींद्र वानखेडे, डॉ. श्रीकांत वैरागडे, डॉ. जगदीश निंबार्ते, हेमंत महाकाळकर, नरेंद्र झंझाड, प्रशांत देशकर, राजू सलाम पटेल, शेखर (बाळाभाऊ) गभने, मनीष वासनिक, सुनील साखरकर, राजेश वासनिक, कीर्ती गणवीर, मंजुषा बुरडे, महेंद्र वाहने आणि सोहेल अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गणेश चौधरी, अमन मेश्राम, विक्रम उजवणे, विजय खेडेकर, भानुदास बनकर, खुशाल निपाने, महेश जगनाडे, पंकज काळे, फरहान पटेल, धनंजय ढगे, थामदेव निमजे, धनवंता बोरकर यांच्यासह पक्षाचे सर्व आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसने त्वरित माफी न मागितल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
Source link
सुनेत्रा पवारांविषयी गुंगी गुडिया विधानावरून राष्ट्रवादी आक्रमक:भंडाऱ्यातील गांधी चौकात निदर्शने; काँग्रेसने माफी मागण्याची मागणी
