Headlines

क्रिकेटने प्रगती साधली, पण मद्यपानाची संस्कृती तशीच; बेन स्टोक्सचं मोठं वक्तव्य! स्वतःच्या आणि संघाच्या व्यसनावरही उघडपणे बोलला


Ben Stokes On Alcohol In Cricket : अलिकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या बेन स्टोक्सने दारूच्या व्यसनावर मनमोकळे भाष्य केले आहे. स्टूअर्ट ब्रॉड अन् जोस बटलरसोबतच्या पॉडकास्टमध्ये त्याने काय काय म्हटलंय?

Ben Stokes News
बेन स्टोक्स
मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्याने अलिकेडेच एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेट क्षेत्रातल्या मद्यपानाच्या संबंधांवर उघडपणे भाष्य केले आगहे. स्टूअर्ट ब्रॉड आणि जोस बटलर यांच्यासोबतच्या ‘फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट’ या पॉडकास्ट शोमध्ये त्याने म्हटलं की, “आज आपण २०२६ या सालामध्ये आहोत, गेल्या अनेक वर्षांमध्ये क्रिकेट हा खेळ अधिक प्रोफेशनल झाला आहे. त्याने व्यावसायिक प्रगतीही साधली आहे, परंतू त्याचे अल्कोहोलशी असलेले नाते हे जशास तसेच राहिले आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही”, असं स्टोक्सने सांगितलं. त्याने या पॉडकास्टमध्ये आणखी काय म्हटलंय? जाणून घेऊयात.

नेमकं काय म्हणाला स्टोक्स?

पुढे स्टोक्स म्हणाला, “इंग्लंडच्या संपूर्ण संघाला व्यसनी म्हणणे चुकीचे ठरेल, पण हे सत्य आहे की क्लब क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत मद्यपानाची संस्कृती आजही आहे. आज खेळ कितीही व्यावसायिक झाला असला, तरी या एका गोष्टीत विशेष बदल झालेला नाही. १९८० च्या दशकापासून क्रिकेट आणि दारुचे संबंध जैसे थे तसेच राहिले आहेत. माझ्या दारुच्या व्यसनाबद्दल सांगायचे तर माझ्या कारकिर्दीमध्ये ते गंभीर प्रकारचे राहिले आहेत, असं म्हणता येईल पण आता सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही.”

Maharashtra TimesNeel Patel : 15 वर्षीय वैभवला टक्कर देण्यासाठी कांगारुंनी 16 वर्षांचा घातक फलंदाज उतरवला, भारताशीही आहे नातं; कधी येणार आमने-सामने?

सतत वादांमध्ये अडकला

दरम्यान, बेन स्टोक्स न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यासाठी खेळायला गेलेला असताना तिथे चेल्सी मधील एका नाईट क्लबमध्ये रात्री उशिरा झालेल्या हाणामारीमुळे तो वादात सापडला होता. स्टोक्स वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. २०१७ मध्येही ब्रिस्टॉल येथील एका नाईट क्लबमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीनंचर त्याच्यावर क्रिकेट बोर्डाने कारवाईही केली होती. या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता.

Maharashtra TimesTeam India Coach : दोन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी अन् आशिया कप जिंकून दिले, टीम इंडियाच्या कोचचा मध्येच निरोप! भावुक इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
पुढे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. या प्रकरणात त्याने समलैंगिंक पुरुषांचा बचाव केल्याचे निष्पन्न झाले होते, जे अत्याचाराचे बळी ठरणार होते. त्यांचा बचाव करताना तो वाद उफाळून आला होता, असे सांगण्यात आले, त्यानंतर स्टोक्सला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले होते.

दरम्यान, बेन स्टोक्सने जून २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटमुळे शरीरावर आलेला ताण आणि वाढलेले वय यामुळे तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकला होता. शिवाय, कर्णधारपदाशिवाय केवळ खेळाडू म्हणून खेळणे त्याला कठीण वाटत होते, असे त्याने निवृत्ती घेताना स्पष्ट केले होते.

इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची तयारी सुरू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर पुढे काय? या प्रश्नावर बोलताना बेन स्टोक्सने आपल्या भविष्यातील योजना स्पष्ट केल्या. त्याला भविष्यात इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनायचे आहे. यासाठी त्याने आतापासूनच लेव्हल-३ कोचिंग कोर्स करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून तो थेट कोचिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवू शकेल.