काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?
ICRA संस्थेच्या अर्थतज्ज्ञ यांच्या आदिती नायर म्हणतात की, “सध्या महागाई नियंत्रणात आली आहे त्यामुळे Repo Rate बदलण्यापेक्षा तो आहे तसाच ठेवणे कधीही सोयीस्कर ठरेल.” तर IDFC First Bank चे अर्थतज्ज्ञ गौरा सेनगुप्ता सांगतात की, “पुरवठ्या संबंधित असलेल्या अडचणींमुळे देशात महागाई वाढत आहे. त्यामुळे Repo Rate आताच वाढवण्याची फारशी गरज नाही.” जन स्मॉल फायनान्स बँकचे ट्रेझरी प्रमुख गोपाळ त्रिपाठी यांचे म्हणणे आहे की, “आधी RBI ची मान्सूनस्थिती लक्षात घेतली जाईल, तसेच FCNR (B) या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादाचा अभ्यास केला जाईल आणि त्यानुसारच पुढे Repo Rate संबंधित निर्णय घेतला जाईल.”
बहुतेक तज्ज्ञांनी यंदाच्या बैठकीत Repo Rate मध्ये काहीच बदल न करता जो आधीपासून आहे तोच पुढे ठेवण्यात येईल असे मत व्यक्त केले आहे. आताच RBI Repo Rate एकूण 5.25% इतका आहे आणि तोच पुढे कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Repo Rate का बदलण्यात येणार नाही यामागे काही कारणे स्पष्ट केली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते भविष्यात महागाई पुन्हा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे RBI Repo Rate वाढवण्याची घाई तर मुळीच करणार नाही. तसेच GST Rate टिकवून ठेवण्यासाठीही RBI रेपो रेटमध्ये बदल करणार नसण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते रेपो रेटमध्ये काहीही बदल न करता, तो तसाच ठेवणे जास्त सोयीस्कर ठरेल.
जगभरात महागाई वाढली आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांत तणावपूर्ण वातावरण आहेत त्यामुळे भविष्यात कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. तसेच मान्सूनशी संबंधित धोक्यांमुळे भविष्यात आणखीन महागाई वाढू शकते अशी शक्यता बहुतेक तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
EPFO कडून नोकरदारवर्गासाठी आनंदाची बातमी; आता फक्त 2 दिवसांत खात्यात जमा होणार तुमच्या PF ची रक्कम
Repo Rate बदलला तर सामान्य माणसावर काय परिणाम होईल?
रेपो रेट म्हणजे RBI ने इतर बँकांना दिलेल्या कर्जावरील व्याज दर. जेव्हा व्याज दर महागतं तेव्हा कर्ज महागतं. हेच व्याज बँका त्यांच्या ग्राहकांवर लादतात. एकंदरीत, जेव्हा Repo Rate वाढतो तेव्हा देशातील जवळजवळ सगळ्याच बँकांचे कर्ज महागतात त्यामुळे सामान्य माणसांचे EMI महागतात. परिणामी, सामान्य माणूस कमी खर्च करू लागतो आणि देशातील महागाईला नियंत्रणात ठेवता येते. पण जेव्हा RBI रेपो रेट कमी करतो. तेव्हा कमी व्याज दर असल्यामुळे बँकांना कर्ज स्वस्तात मिळतात. बँकांना कर्ज स्वस्त मिळाल्यामुळे सामान्य माणसांचे EMI ही स्वस्त होते. परिणामी, सामान्य व्यक्तींचे खर्च करण्याचे प्रमाण वाढते आणि याचाच परिणाम म्हणजे देशात महागाई वाढते.

