Headlines

धरणांत पाणी, तरी खरिप सिंचनाच्या प्रतीक्षेत; सरासरीच्या 52 टक्के पाऊस:मुळा धरण 71टक्क्यांवर तर निळवंडे, भंडारदरा दोन्ही धरणे ओव्हरफ्लो‎



एलनिनो इफेक्टमुळे पावसात मोठा खंड पडत असला तरी जिल्हाभरात सुमारे ६ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. घाटमाथ्यांवर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे भरली; परंतु, पर्जन्यछायेच्या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत सरासरीच्या ५२ टक्

.

आवर्तन गरजेचे असताना धरण प्राधिकरणाकडून सप्टेंबरअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याच्या निर्णयाकडे बोट दाखवले जात आहे. आवर्तन सोडल्यास भूजलपातळी वाढून विहीर बागायत क्षेत्रासह खरीपाला दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात मुळा, भंडारदरा व निळवंडे हे तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी भंडारदरा व निळवंडे धरणांचा जलसाठा सुमारे ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. मुळा धरणाचा जलसाठा मात्र अद्याप ७१ टक्क्यांवर आहे.शासनाने एलनिनो इफेक्टच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून सिंचनाचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सद्य:स्थितीत जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणी आल्यामुळे तो निर्णय सद्य:स्थितीत अप्रासंगिक मानला जात आहे. जर खरीप वाया गेला, तर धरणातील पाण्याचा काय उपयोग? असा सवाल उपस्थित होत आहे. तिकडे जायकवाडी धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे, तसे आवर्तन मुळा धरणातूनही सोडण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. { गोदावरी नदी : नांदूर-मधमेश्वर धरण विसर्ग – ३९,९१७ क्युसेक. { प्रवरा नदी : भंडारदरा धरण विसर्ग – ७,६५९ क्युसेक. { निळवंडे धरण विसर्ग: ७,४१३ क्युसेक. { ओझर बंधारा विसर्ग: ९,०८३ क्युसेक. सह्याद्री घाटमाथा व परिसर वगळता अहिल्यानगर व नाशिकच्या पर्जन्यछायेतील असलेल्या उर्वरित भागात अद्यापपर्यंत सरासरीच्या केवळ ४० टक्के इतकाच पाऊस झाला आहे. सध्या भूजलपातळी खालावलेली आहे. ओढे-नाले न वाहिल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे धरण प्रकल्पातील खरीप पिकांना कालव्यांद्वारे आधार मिळाला तरच त्यांना जीवदान मिळेल. उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता

नद्यांमधून सुरू असलेले विसर्ग

मागणी नाही, ‘मुळा’मध्ये कमी पाणी ^ अद्याप खरीपात आवर्तन सोडण्यासाठी मागणी आलेली नाही. तसेच धरणातही पाणी कमी आहे. ओव्हरफ्लो नाही, त्यामुळे आता पाणी सोडल्यास आकारणी करावी लागेल. तथापि, धरणात कमी पाणी असून, सप्टेंबरअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले आहे. सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा.

निळवंडे धरणातून शनिवारी दुपारी अडीच वाजता पॉवर हाऊसद्वारे ७०० क्युसेक व सांडव्याद्वारे ११ हजार ९५५ क्युसेक, अशा एकूण १२ हजार ६५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार हा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी-जास्त करण्यात येईल. नदीकाठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आवर्तन दिल्यास पर्जन्यछायेत दिलासा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत