Headlines

Commonwealth Games 2026 : फक्त एका किलोने हुकलं सुवर्ण, भाजी विक्रेत्याच्या नातवाने रौप्य पदकावर कोरलं नाव, कोण आहे लवप्रीतसिंग?


lovepreet singh won silver medal : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडू पदकांची कमाई करत असून त्यांनी आधी घेतलली मेहनत फळाला येत असल्याचं दिसत आहे. भारताचा खेळाडू लवप्रीत सिंग याचे अवघ्या एका किलोनो सुवर्णपदक हुकल्याने मात्र रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. कोण आहे लवप्रीत सिंग जाणून घ्या.

Neeraj Chopra Yashvir Singh Medal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : वेटलिफ्टिंगमधील ११० किलोपेक्षा जास्त वजनी गटाच्या स्पर्धेस ‘बिग मेन ऑफ वेटलिफ्टिंग’ संबोधले जाते. ‘राष्ट्रकुल’मधील या स्पर्धेत पदकासाठी कमालीची चुरस झाली. त्यात लवप्रीतसिंगने भारतास रौप्यपदक जिंकून दिले. चार वर्षांपूर्वीच्या बर्मिंगहॅम स्पर्धेतील ब्राँझनंतर त्याने ही कामगिरी केली; मात्र त्याला सुवर्णपदक एक किलोने दुरावल्याची खंत होती.

बर्मिंगहॅम स्पर्धेतील १०९ किलो गट आता ११० किलोपेक्षा जास्त झाला होता. स्पर्धा वाढली होती, लवप्रीतने स्नॅचमधील १६८ किलो, १७३ किलो आणि १७६ किलो या तिन्ही प्रयत्नांत स्पर्धा विक्रम केला; मात्र तो यास क्लीन अँड जर्कची जोड देऊ शकला नाही. त्याला यात २१२ किलोच वजन पेलता आले. त्याने एकूण ३८८ किलो वजन उचलले. त्याला न्यूझीलंडच्या डेव्हिड लिती याने एकूण ३८९ (१६६ आणि २२३) वजन पेलून मागे टाकले.
Maharashtra TimesCommonwealth Games 2026 : भालाफेकमध्ये भारताचा डबल धमाका, नीरज चोप्राचे रौप्य तर यशवीर सिंगला कांस्य; एका विक्रमी थ्रोने संपूर्ण गेम पालटला
या स्पर्धेत सामोआचा सानेले माओ हा संभाव्य विजेता मानला जात होता; मात्र तो स्नॅचच्या तिन्ही प्रयत्नांत १७५ किलो वजन पेलू शकला नाही आणि स्पर्धेतून बाद झाला. अमृतसरमधील शिंप्याचा मुलगा; तसेच भाजीविक्रेत्याचा नातू असलेल्या लवप्रीतने याचा फायदा घेऊन स्नॅच प्रकारानंतर १७६ किलोसह आघाडी घेतली होती. क्लीन अँड जर्कमध्ये तिसऱ्या प्रयत्नात लवप्रीत २१७ किलो वजन पेलू शकला नाही. याचा फायदा घेऊन लितीने २२३ किलो या यशस्वी वजनासह बाजी मारली.
Maharashtra TimesDilip Gavit Gold Video : नाशिकचा मराठमोळा सुपुत्र दिलीप गावितने राष्ट्रकुल गाजवलं, 100 मीटरमध्ये भारताला सुवर्ण, एकाच रेसमध्ये दोन पदकं
स्नॅच झाल्यानंतर मी सुवर्णपदक जिंकणार याची मला खात्री वाटत होती; मात्र क्लीन अँड जर्कच्या अखेरच्या प्रयत्नात काय झाले ते सांगणे अवघड आहे. यापेक्षाही जास्त वजन मी सरावात उचलले. सुवर्णपदक हुकल्याची नक्कीच खंत आहे, असं लवप्रीतसिंग म्हणाला.
Maharashtra TimesAjinkya Rahane News : 20 वर्षांचा प्रवास, निवृत्तीआधीचा प्रसंग, अजिंक्यच्या पत्नीनं इमोशनल पोस्टमधून मन मोकळं केलं, प्रत्येक शब्द बोलका!

बॉक्सिंगमध्ये ‘सुवर्ण’संधी

बॉक्सर अरुंधती चौधरी हिने ७० किलो गटात गतविजेत्या रोझी एक्लेस हिला (वेल्स) पराभवाचा धक्का दिला… अशीच खणखणीत कामगिरी शुक्रवारी जागतिक विजेती जास्मिन लांबोरिया (५७किलो), प्रीती पवार (५४ किलो), अंकुश पंघल (८० किलो) आणि जादुमणीसिंग (५५ किलो) यांनीही केली. यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगच्या विविध गटांत भारताला ‘सुवर्ण’ संधी निर्माण झाली आहे. गोंधळाचे वातावरण आणि – संयमाची कसोटी बघणाऱ्या ७० किलो गटाच्या उपांत्य फेरीत अरुंधतीने रोझी एक्लेस हिचा ४-० असा फडशा पाडला. सामन्यातील पहिल्या दोन फेऱ्यांतील दमदार कामगिरीचा फायदा घेत अरुंधती हिने रोझीला स्टैंडिंग – काउंट स्वीकारण्यासही भाग पाडले. जास्मिनने ५७ किलोच्या उपांत्य लढतीवर वर्चस्व गाजवले. तिचा झंझावात एवढा होता, की प्रतिस्पर्धी लेसोथो हिला दुसऱ्या फेरीच्या अखेरस तिसरा स्टैंडिंग काउंट मिळाला. यामुळे रेफ्रींनी स्टॉप्स कॉन्टेस्ट (आरएससी) निर्णय देऊन जास्मिनला विजयी घोषित केले.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा