Headlines

मुलगा आजारी, घरी जायला पैसे नाहीत; कॉमेडी नटाने खोटं बोलून पैसे लाटले, महेश टिळेकरांना आला धक्कादायक अनुभव


मुंबई: मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या आर्थिक फसवणूक,मानधन थकवणे यासारखे अनेक प्रकार समोर येत आहेत. अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीतल्याच कलाकारांकडून आर्थिक फसवणूक झाल्याचे अनुभव शेअर केले आहेत. मराठी सिनेइंडस्ट्रीतले लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनाही असे अनेक अनुभव आले. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या ‘सेलिब्रिटी कॉर्नर’ या विशेष मुलाखतीत त्यांनी असाच एक प्रसंग सांगितला.

काय म्हटलं महेश टिळेकर यांनी?

खरं तर मराठी सिनेविश्व हे एक कुटुंब असल्याचं म्हटलं जातं. बरीच कामं ही विश्वासावर , मैत्रीखातर केली जातात. पण यातूनच अनेकदा फसवणूकही होते. याबद्दल सांगताना महेश टिळेकर यांनी काही किस्से सांगितले.

इंडस्ट्रीत दिलेले पैसे, मदत केलेले पैसे कधीच परत मिळत नाहीत, फार क्वचित ठिकाणी ते परत मिळतात. मी तर हे आता सोडूनच दिलंय. एक सुपर डुपर निर्माता आहे. त्यानं तर माझ्या दिग्दर्शनाचे पैसेही नाही दिलेत. मी कॉन्ट्रॅक्ट न करता आतापर्यंत काम केलंय. शब्दालाही किंमत असते. कारण कॉन्ट्रॅक्ट करूनही पैसे बुडवणारेही खूप जण आहेत. माझ्या सोबत काम केलेल्या कोणालाही विचारा, महेश टिळेकरांनी पैसे थकवलेत का? प्रत्येकाचे मानधन वेळेत दिले जाते. खरं तर आर्टिस्टवर पैसे मागण्याची वेळच आली नाही पाहिजे, असंही टिळेकर म्हणाले.

Maharashtra TimesKushal Badrike on Viju Mane: विजू मानेने घरातले दागिने गहाण ठेवून सिनेमा बनवलाय, आता ‘स्पायडरमॅन’ मुळे मराठी चित्रपटांना शो नाहीत; कुशल बद्रिकेची नाराजी

विनोदी नटाने मागितले पैसे
तसंच एक विनोदी नट आहे. त्याला मी कधी भेटलोच नाही.त्याचा अचानक फोन आला. ‘मी एका कार्यक्रमाला आलोय, त्यांनी मला चेक दिलाय. पण घरी जायला पैसे नाहीत, माझा मुलगा आजारी आहे. मला जरा अर्जंट मदत कराल का?’, मी त्याला म्हटलं करतो मदत. मी काही तरी कामात होतो. त्याचे लगेच फोनवर फोन, मेसेजवर मेसेज, सर पाठवले का पैसे. मी पण नंतर लगेच पैसे पाठवले.

पैसे पाठवल्यानंतर त्याचा साधा थॅक्यूचाही मेसेज आला नाही. तीन-चार महिन्यानंतर पुन्हा त्याचा फोन आला. तेव्हा तो फोनवर तेच सांगत होता. एका कार्यक्रमला आलोय, चेक दिलाय अन् पैसे नाहीयेत. तेव्हा टिळेकरांच्या लक्षात आलं की, काही तरी गडबड आहे. त्यांनी त्याला विचारलं की, तुला मलाच का मागावेसे वाटले पैसे, त्यावर तो म्हणाला की, माझा आतला आवाज सांगतोय की, तुम्ही मला मदत कराल.

पाहा संपूर्ण मुलाखत

नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत

Maharashtra TimesRashmika Mandanna Injury: अभिनेत्री रश्मिका मंदाना शूटिंगदरम्यान जबर जखमी, डॉक्टरांनी दिला सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला

‘तू मला मूर्ख बनवतोय’
तर त्या विनोदी नटाचं बोलणं ऐकल्यानंतर टिळेकरांनीही त्याला सुनावलं. माझाही आताला आवाज सांगतोय की, तू मला मूर्ख बनवतोय. मागच्या वेळी तुला पैसे दिले, तेव्हा साधं थॅक्यूही बोलला नाहीस. हा प्रकार आता तुझ्या नावासकट सोशल मीडियावर टाकणार असल्याचं टिळेकरांनी त्याला त्यावेळी म्हटलं होतं, पण त्यानं असं करू नका अशी विनंती केली होती. तेव्हा मी फोन कट केला… आजतागायत त्याने पैसे परत केले नाहीत, असंही टिळेकरांनी या मुलाखतीत सांगितलं.