Headlines

ITR Filing Penalty; 31 जुलैची डेडलाइन चुकली, आता इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करायला 5000 रुपयांचा दंड बसणार; कोणाला मोफत भरता येणार?



Income Tax Return ( ITR ) भरण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. कामाच्या गडबडीत किंवा इतर काही कारणांमुळे दिलेल्या मुदतीमध्ये ITR भरणे काहींना शक्य झाले नसेल किंवा अनेकांची तारीखही चुकली असेल. परंतु, ही चूक करणे आपल्या खिशाला जडही जाऊ शकते. ITR च्या नियमांनुसार, जर आपण दिल्या गेलेल्या मुदतीमध्ये ITR भरला नाही तर आपल्याला 5000 हजार रुपयांपर्यंतची रक्कम दंड म्हणून भरावी लागते. पण ITR भरण्याची मुदत चुकवणाऱ्या काही जणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण मुदतीची तारीख चुकवणाऱ्या प्रत्येकाच्याच खिशातून 5000 रुपयांची रक्कम गायब होणार नाहीये. दंडाची रक्कम ही पूर्णपणे भुगतान करणाऱ्या व्यक्तीच्या एकूण उत्प्नन्नावर आधारित आहे.

मग तुम्हाला किती रुपयांचा दंड भरावा लागेल?

जर तुम्ही ITR भरण्याची तारीख चुकवली असेल तर एक गोष्ट मात्र खरी की याचा फटका तुमच्या खिशाला नक्कीच बसणार आहे. पण तो किती बसणार आहे? हे पूर्णपणे तुम्ही किती कमवता यावर अवलंबून आहे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे तर थोडाफार सुटकेचा श्वास सोडा, कारण तुमच्या खिशाला 5000 रुपयांचा फटका बसणार नाहीये. पण तुम्हाला 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या भुगतान कर्त्यांसाठी ITR ची मुदत चुकवली तर 1000 रुपयांचा दंड भरावा लागतो. तर 5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या भुगतान कर्त्यांना दंड म्हणून एकूण रक्कम 5000 रुपये भरावी लागणार आहे.

महत्वाची गोष्ट अशी की ठरवण्यात आलेल्या या लेट फीज त्या प्रत्येक भुगतान कर्त्याला लागू होते जे आयकर कायदा 2025 च्या अंतर्गत देय आहेत. असेसमेंट इयर 2026-27 तसेच त्याआधीच्या वर्षांसाठी जुना कायदा कलम 234F अंतर्गतच शुल्क भरावे लागणार आहे.

दंड भरल्यावर वाढीव मुदत कधीपर्यंत असणार?

Income Tax Return साठी 31 जुलै 2026 तारीख निश्चित करण्यात आली होती. काही कारणांमुळे देय रक्कम वेळेवर भरता आली नसणाऱ्या भुगतान कर्त्यांना दंड भरावा लागणार आहे. जर तुमची वार्षिक कमाई 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर निश्चितच तुम्हाला 1 हजार रुपयांची भरपाई करावी लागणार आहे. तर 5 लाखांहून जास्त कमाई असणाऱ्या व्यक्तींना 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पण त्यासाठी तुमची नोंदणी आयकर कायदा 2025 च्या अंतर्गत असावी. दंड भरल्यावर ITR भरण्यासाठी वाढीव मुदत मिळेल. एकंदरीत, ही मुदत 31 डिसेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात येईल म्हणजेच 31 डिसेंबर 2026 ही तारीख बिलेटेड रिटर्न भरण्याची तारीख आहे.

आयकर कायदा 2025

आयकर कायदा 2025 हा कायदा 1 एप्रिल 2026 पासून देशभरात लागू करण्यात आला होता. आधी असेसमेंट इयर म्हणून ओळखली जाणारी पद्धत बंद करण्यात आली असून आता Tax Year ही पद्धत वापरली जाते. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान कमवले गेलेले उत्पन्न या कायद्याअंतर्गत गणले जातील.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत