Headlines

I am the First Wife Woman Stops Husbands Second Wedding in Kanpur Video Viral | ‘मी पहिली बायको आहे तुला सोडणार नाही’, नवरा गुपचूप करत होता दुसरं लग्न, बायकोनं पकडलं रंगेहात, व्हिडीओ व्हायरल


UP Viral wedding video: एक पत्नी असताना एक तरुण गुपचूप दुसरं लग्न करत होता. मात्र, त्याच्या पहिल्या पत्नीनं लग्नमंडपात शिरून एकच गोंधळ घातला. दरम्यान, नवरदेव तिथून गुपचूप पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. कानपूरमधील या लग्नाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आता तुम्हीच सांगा, अशा मंडळींवर कोणती कारवाई केली पाहिजे?

Viral wedding video
(फोटो सौजन्य – @PredatorVolk/x.com)
विचार करा… मोठ्या थाटात लग्न सुरू आहे. मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सर्व विधी पार पडत आहेत. वधू आणि वर दोघेही आनंदी आहेत. पाहुणे मंडळी त्यांना आशीर्वाद देत आहेत. तितक्यात एक महिला लग्नमंडपात येते आणि “मी नवरदेवाची पहिली पत्नी आहे,” असं सांगते. होय, धक्का बसला ना? असंच काहीसं प्रकरण वास्तवात घडलं आहे. कानपूरमधील एका लग्नात एक महिला थेट पोलिसांना घेऊन आली आणि तिनं नववधूला बाजूला सारत आपण त्याची पहिली पत्नी असल्याचं सांगितलं. या लग्नाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. पुढे या लग्नात जे काही घडलं, ते पाहून तुम्हीही अचंबित व्हाल.

नेमकं प्रकरण काय आहे?

ही घटना कानपूरमधील चकेरी भागात घडली आहे. नवरदेवाचं नाव आसिफ मोहम्मद आहे. त्यानं २०२२ मध्ये सहाना हसन नावाच्या महिलेसोबत लग्न केलं होतं. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये वाद झाले. परिणामी, २०२४ पासून दोघेही वेगळे राहू लागले. दरम्यान, सहानानं आसिफविरोधात कौटुंबिक अत्याचाराचा खटला दाखल केला होता. तर दुसरीकडे, आसिफने वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यामुळे हा वाद न्यायालयात प्रलंबित होता. मात्र, दोघांचा घटस्फोट झालेला नव्हता. याच दरम्यान आसिफनं दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या पत्नीनं लग्नमंडपात शिरून एकच गोंधळ घातला आणि नवरदेवाचं दुसरं लग्न रोखलं.

नवरदेवाला पोलिसांनी पकडलं

हा व्हिडीओ @PredatorVolk या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पहिली पत्नी नववधूला म्हणताना दिसते, “तुला माहीत आहे मी कोण आहे? मी यांची पहिली पत्नी आहे. आमचा अजून घटस्फोट झालेला नाही आणि मी हे लग्न होऊ देणार नाही.”

यानंतर लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. नवरदेवानं तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहानासोबत आलेल्या पोलिसांनी आसिफला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं. महिलेच्या आरोपांमागील सत्य काय आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा