सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, आय क्यू एसी आणि एनसीसी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन विषयावर व्याख्यान,मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८-३० ते १०-३० या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. तसेच १५ ऑगस्ट ९-३० ते ११-०० या वेळेत न्यू शिवाजी हायस्कूल, कॉमर्स व सायन्स जांभवडे, या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान या व्याख्यानासाठी मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त सहाय्यक मुख्य अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन श्री राजेंद्र लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी ऍड, सुनील लाड निवृत्त प्रमुख अधिकारी महा,नगर,पालिका (दुकाने व आस्थापना ) मुंबई यांची उपस्थिती राहणार आहे.
