Headlines

Duleep Trophy 2026 Rajat Patidar named Central Zone captain Rinku Singh vice captain full squad; दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोनचा संघ जाहीर! रजत पाटीदार कर्णधार, तर टीम इंडियातील फिनिशर उपकर्णधार, संघात आणखी कोणाला संधी?


Duleep Trophy Central Zone Squad : २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी गतविजेत्या सेंट्रल झोनचा संघ घोषित करण्यात आला आहे. रजत पाटीदारच्या हाती संघाची कमान देण्यात आली आहे तर टीम इंडियातील फिनिशर उपकर्णधार बनवला आहे.

Duleep Trophy Central Zone Squad
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोनच्या (Central Zone) संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या मोसमातील विजेत्या सेंट्रल झोनचे नेतृत्व रजत पाटीदारकडे सोपवण्यात आले आहे. तर आक्रमक फलंदाज रिंकू सिंग उपकर्णधार म्हणून त्याची साथ देणार आहे. ६ ते १० सप्टेंबर दरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

रजत पाटीदारवर पुन्हा मोठी जबाबदारी

आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदारला संघाने पुन्हा एकदा कर्णधारपद दिले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघात एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येतो. तो स्वतः पुढे राहून संघाचे नेतृत्व करतो. आगामी काळात त्याला भारतीय संघातही संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra TimesJasprit Bumrah Sri Lanka Tour : फिटनेस टेस्ट पास करणारा बुमराह श्रीलंका कसोटी खेळणार की नाही? बीसीसीआयनं ठेवला सस्पेन्स, काय घडतंय?

रिंकू सिंगवर उपकर्णधारपदाची धुरा

गेल्या मोसमात उत्तर प्रदेशसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याच्यावर ही नवीन जबाबदारी टाकण्यात आली आहे. रजत पाटीदारच्या अनुपस्थितीत किंवा महत्त्वाच्या क्षणी रिंकूच्या निर्णयांवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

Maharashtra TimesPriya Ghanghas Gold : जय हो! कॅनडाच्या बॉक्सरची धुळधाण उडवत प्रियाने जिंकलं सुवर्णपदक; भारताच्या खात्यात बॉक्सिंगमधील चौथं गोल्ड

इतर झोनमध्येही कर्णधारपदाचे फेरबदल

वेस्ट झोन: गेल्या मोसमात शार्दुल ठाकूरकडे असणारे कर्णधारपद आता ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे.
ईस्ट झोन: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे उपकर्णधारपद देऊन सिलेक्टर्सनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

असा आहे सेंट्रल झोनचा पूर्ण संघ

रजत पाटीदार (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), आर्यन जुयाल (विकेटकीपर), सारांश जैन, अमन मोखाडे, कुणाल चंडेला, झिशान अंसारी, आर्यन पांडे, अर्शद खान, आयुष पांडे, यश राठोड, हर्ष दुबे, कुणाल सिंग राठोड (दुसरा विकेटकीपर), यश ठाकूर, नचिकेत भुते.
स्टँडबाय खेळाडू: अमनदीप खरे, मयांक मिश्रा, सौरभ रावत, भार्गव मेराई, कुणाल यादव, कुमार कार्तिकेय.

Maharashtra TimesAsmita dey : सायकल मेकॅनिकच्या मुलीनं भारताला ज्युडोमध्ये दिलं पहिलं गोल्ड! कोण आहे अस्मिता डे? जिद्दी खेळाडूचा प्रवास वाचा
बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सीलन्स’मध्ये हे सर्व सामने खेळवले जाणार आहेत. सेंट्रल झोन हा या स्पर्धेचा गतविजेता संघ असल्याने, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघ ही ट्रॉफी राखणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा